पातुर्डा येथील दादासाहेब बाहेकर उर्दू हायस्कूल च्या १००% निकालाची परंमपरा कायम मुली अव्वल !
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्याती पातुर्डा येथील दादासाहेब बाहेकर उर्दु हायस्कुल च्या विद्यार्थ्यानी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाण पत्र परिक्षेत इयत्ता १० वी मध्ये उज्वल यश संपादन करित १००% निकालाची परंमपरा कामय ठेवली मार्च 2024 एस.एस.सी. परीक्षेत शाळेतून 54 विद्यार्थी परीक्षेत बसले होते 54 पैकी 54 विद्यार्थी उत्तीर्ण.शाळेचा चा निकाल १०० % लागला असुन दादा साहेब बाहेकर उर्दु हायस्कुल मधुन
समरीन फिरदोस सैय्यद कुदरत 76.4 गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला तर मसररत परवीण रफिक शाह 73.0 द्वितीय शेख फरहान शेख इरफान 72.4 तृतीय शेख अजलान शेख मुजीब 71.8 चर्तुथ क्रमांकावर आला शाळेतील 1 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी मध्ये, 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 29 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष शेख नियाजोद्दिन प्राचार्य कलीम खान अमानुअल्लाह खान व संस्था संचालक शिक्षक वृंद यांनी गुल पुष्प देऊन कौतुक केले