पातुर्ड्यात मुसलीम समाज सामुहिक विवाह १० जोडपे विवाह बद्ध प्रत्येक जोडप्यानां संसार उपयोगी साहित्या सह किराणा किटचे वितरण

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील धार्मिक सामाजीक शैक्षणीक संस्था मदर्सा जियाउल उलुम च्या ५७ व्या वर्धापन दिना निमित्त मुसलीम समाजातील गरिब गरजु मुला मुलीचा सामुहिक विवाह सोहळा १ फ्रेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उत्सहात संपन्न झाला या सामुहिक विवाह सोहळ्यात १० जोडपे विवाह बद्ध झालेत
कार्यक्रमाचे उदघाटन दारुल उलुम हुसेनीयाचे अध्यक्ष मौलाना मो युसुफ यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मदर्सा जिया उल उलुमचे अध्यक्ष मौलाना सैय्यद अफसर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन मौलाना बाबामिया , मौलाना अब्बास खान , मौलाना महेमुद बेग , मौलाना शेख अफसर , मुफ्ती अनिस , मौलाना अ. रहेमान , मुफ्ती अ रहेमान , अड प्रसेन्नजीत पाटील , डॉ संदिप वाकेकर , विश्वनाथ झाडोकार , माजी जि प अध्यक्ष प्रकाश पाटील , माजी जि प उपाध्यक्ष संगितराव भोंगळ , माजी पं स सभापती अविनाश आकोटकार, कृषि उत्पन्न बा समिती संचालक रविन्द्र झाडोकार , मिर कुर्बान अली मनोहर बोराखडे , डॉ प्रविण पाटील , ठाणेदार राजेन्द्र पवार , डॉ म्हसाळ , डॉ सावसुन्दर डॉ पुंडे , सरपंच रणजीत रामदास गंगतीरे राधाकृष्ण मंदिर संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बगाडे , डॉ बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श समिती अध्यक्ष कैलास दाभाडे , श्री बालाजी मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुरेश चांडक सह दारुल उलुम मदर्साचे शिक्षक वृंद आदी उपस्थिती होती प्रास्ताविक मदर्सा जियाउल उलुमचे अध्यक्ष मौलाना सैय्यद अफसर यांनी महागई च्या काळात सर्वच समाजातील मुलीचे विवाह आधुनिक युगात बदलत्या वातावरणामुळे सर्व सुख सुविधा युक्त वस्तु वाढलेले आमीष त्यात गरिब हात मजुर उत्पन्नाचा स्त्रोत नसल्याने खर्च हुंडा देण्याची ऐपत नसल्याने विवाह ईच्छुक मुलीचे विवाह रखडले हि वस्तुस्थिती असल्याने मदर्सा जियाउल उलुम संस्थेच्या पुढाकाराने मुसलीम समाजातील गरिब मुला मुलीचा निकाह स्वता त्यांनी लावला या सामुहिक विवाहात १० जोडपे विवाह बद्ध झाले संचालन मुफ्ती अ. रहेमान यांनी केले तर आभार हाफीज मो आरिफ यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौलवी शेख अजहर , हाफीज मो आरिफ , कारि अब्दुल कदिर , हाफीज मुजाहिद , हाफीज मो अलाऊद्दीन मुसलीम समाजातील सामाजीक कार्यकर्ते व युवक मदर्सा जियाऊल उलुमचे विद्यार्थी पातुर्डा ग्रामस्थांनी प्रयत्न केले
मदर्सा जिया उल उलुम संस्थेच्या वतीने १० विवाह बद्ध जोडप्यांना संसार उपयोगी साहित्य भेट
त्यात गोदरेज आलमारी , फ्रीज , कुलर , गॅस सिलेन्डर , सिलाई मशीन, हमाम सट , प्रेस , किचन सेट , मिक्सर , कुराण पेटी , मुसलला , गालीचा , दिवाण पलंग , गादी बिल्यांकेट , किराणा किट असे संसार उपयोगी जिवनाश्य वस्तु मदर्सा जिया उल उलुम चे अध्यक्ष मौलवी सैय्यद अफसर व सचिव शेख अफसर व संचालक तथा मान्यवरांच्या उपस्थित भेट देण्यात आले
सामुहिक विवाह काळाची गरज मौलाना शेख अफसर
आधुनिक युग त्यात महागई त्यामुळे पंगत हुंडयावर गरिब पालक मुले मुलींच्या विवाहावर खर्च करणे शक्य नाही त्यामुळे सामुहिक विवाह काळाची गरज असुन प्रत्येक समाजातील सामाजीक कार्यकर्ते दानशुर व्यक्तीनी सामुहिक विवाह सोहळ्यासाठी पुढाकार घेऊन सरळ हाताने मदत करावी
मौलाना शेख अफसर
सचिव मदर्सा जिया उल उलुम पातुर्डा बु