पिक विमा योजनेतील बदलामुळे शेतकऱ्यात रोष शासन निर्णय रद्द करा अन्यथा आंदोलन संग्रामपुर शेतकरी कृति समितीचा ईशारा

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] राज्यसरकारने पिक विमा योजनेतील स्थानिक सर्वेक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतलेले निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा नसुन नुकसान कारक आहे शासन निर्णय स्थगित रद्द करण्यात यावे अशी मांगणी संग्रामपुर तालुका शेतकरी कृति समितीच्या वतीने तहसिलदार, कृषि अधिकारी मार्फत राज्यपाल सह संबंधीत विभागा कडे करण्यात आली
दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि सन २०२३ मध्ये ४५ लाख शेतकऱ्यांना स्थानिक सर्वेक्षण झाल्याने लाभ मिळाला चौदा हजार कोटीच्या वर विमा दावे मंजुर झाले होते २०२४ मध्ये खरिप हंगामात अशीच मदत अपेक्षित असतांना पिक विम्या संदर्भात घेतलेला शासन निर्णय शेतकऱ्यावर अन्याय कारण असुन लाखो शेतकऱ्यांना आर्थिक लाभा पासुन वंचीत ठेवण्याचा प्रकार शासनाने पिक विम्या योजने संदर्भात अन्यायकारक बदल रद्द करून पिक विमा संदर्भात स्थानिक सर्वेक्षण पुर्वरत सुरू ठेवावे शासन निर्णय रद्द करण्यात यावे अन्यथा संतप्त शेतकरी लोकशाही मार्गाने शासना विरूध्द आंदोलन छेडण्याचा ईशारा शेतकरी कृति समिती संग्रामपुर च्या वतीने अमोल व्यवहारे , अजय घिवे , सुनिल अस्वार ,महेश अवचार , रोहित सौदागर , शुभंम वसतकार , रोशन उंबरकार , वैभव घिवे, शैलेज देशमुख , मुरलीधर घाटे , प्रशांत भोंगरे , मयुर तायडे , विक्की पिसे , यांच्या सह बहुसंख्यांक शेतकऱ्यांनी दिली आहे