विशेष बातमी

पातुडर्यातील प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम लवकर सुरू होणार ! संगितराव भोंगळ बांधकाम विभाग अधिकाऱ्यां कडून स्थळ माती परिक्षण

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील मंजुरात झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतीचे माती परिक्षण करुन बांधकाम लवकर सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे नेते तथा जि.प.चे माजी उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी जि प कार्यकारी अभियंता विनय घिवे यांची भेट घेऊन केली होती भोंगळ यांच्या मांगणीला यश मिळाले असुन जि प बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विनय घिवे ,सेवा निवृत अभियंता बी पी पाटील , उपविभाग बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विरेन्द्र जुमळे, संग्रामपुर पं स बा विभाग संजय गोरे यांनी पातुर्डा प्रा आरोग्य केंन्द्राला नुकतीच भेट देऊन जे सी बी व्दारे गडडे खोदुन माती परिक्षण साठी नेली
पातुर्डा गावासह पंचकृषीतील १३ ते १४ खेड्यांची लोकसंख्या पाहता प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज आहे. यासंदर्भात माजी जि प उपाध्यक्ष भोंगळ यांनी शासन व प्रशासनाकडे उपरोक्त विषयांचा वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परिणामी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतीस मंजुरात मिळाली होती. मात्र, मंजुरात कामाची ई-निविदा घेतलेल्या ठेकेदाराचा अकास्मित निधन झाल्यामुळे इमारत बांधकामास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती याची जाणीव ठेवत प्रा.आ.केंद्राच्या इमारतीचे नविन टेंडर काढुनी बांधकाम सुरू करावे यासाठी त्यांनी मुलभुत व शाश्वत विकासाला प्रथम प्राध्यान दिले, पातुर्डा गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची अत्यंत गरज आहे. वैद्यकीय उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण स्तरावर शेती हा मुख्य व्यवसाय असल्याने शेतकरी, शेतमजुर व नवजात शिशु सह इतर प्राथमिक उपचाराची गरज आहे त्यामुळे नविन प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज निर्माण होत आहे त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविता यावी यासाठी नव्याने ईमारतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी भोंगळ यांनी केली आहे.जुनी इमारत शतीग्रस्त असल्यामुळे ती पाडण्यात आली त्यामुळे पुर्णतः आरोग्य सेवा कोलमडली.निव्वळ एकाच खोलीतुन वैधकिय अधिकारी करवी रुग्णांना सेवा दिल्या जात असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे व वैधकिय अधिकारीना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे आरोग्यसेवेचा प्रश्न उपस्थित झाला.पातृर्डा गावासह पंचकृषीतील रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी भोंगळ यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा केला. मागिल ५-६ वर्षांपासुन सुरु असलेल्या त्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले मात्र, तांत्रिक अडचणी मुळे मंजुर झालेल्या नव्या ईमारतीचे बांधकाम थांबले. या संदर्भात प्रशासनाने लक्ष देवुन माती परिक्षण करण्यात यावे कारण या परिसरात ईमारतींना तळे जाऊन त्या उलतात त्यामुळे माती परिक्षण करुन लवकर नव्या इमारतीचे बांधकाम सुरु करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता विनय घिवे यांची 11जून24 रोजी भेट घेऊन संगितराव भोंगळ यांनी केली होती हे मात्र विशेष माती परिक्षणाच्या मांगणीला यश मिळाले असुन बांधकाम विभाग जिल्हा परिषद बुलडाणाचे कार्यकारी अभियंता, बाधकाम उपविभाग जळगाव जा पं स बांधकाम विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी पातुर्डा प्रा आ केंन्द्राला भेट देऊन पाहणी केली व माती परिक्षण साठी मातीचे नमुने सोबत घेऊन गेले याचा माती परिक्षणाचा अहवाल आल्या नंतर ईमारतीचा ईस्टीमेट व नकाशा त्याना नविन ई निवादा काढल्या नंतर आचार सहिता लागण्या पुर्वी पातुर्डा प्रा आ केंन्द्राच्या ईमारतीचे बांधकामाला सुरुवात होणार असल्याची माहिती जि प बांधकाम विभागाच्या संबंधीत अधिकारी यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak