विशेष बातमी

प्राध्यापक सुरेश भालतडक यांना पीचडी पदवी प्राप्त

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] कला व वाणिज्य महाविद्यालय  वरवट बकाल येथे वाणिज्य विभागामध्ये कार्यरत प्रा. सुरेश भालतडक यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेची पीचडी पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे. त्यांचा संशोधन विषय ” पश्चिम विदर्भातील नवतरुण वर्गाच्या उपभोग प्रवृत्ती, बचत व गुंतवणूक विषयक सवयी ” एक अध्ययन कालखंड 2010 -11 ते 2019-20 हा होता. प्रा. भालतडक यांनी अगोदरच नेट, सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून आता पीचडी पदवी प्राप्त केल्यामुळे  सातपुडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव इंगळे उपाध्यक्ष हरिभाऊ इंगळे , डॉ संदिप वाकेकर ,डॉ स्वातीताई वाकेकर कला वाणिज्य महाविद्यालयचे प्राचार्य डॉ श्रीराम येरणकर, यांनी कौतुक केले प्रा भालतडक यांना पीएचडी प्राप्त झाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व्यक्त होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *