क्रीडा

प्रेषित व मुसलीम धर्मिय विरुद्ध वादग्रस्त आक्षेपार्ह वक्तव्य  करणाऱ्या   रामगीरी गिरी महाराज यांना अटक करा  मुसलीम समाज बांधवांची मांगणी तामगाव ठाणेदार यांना निवेदन 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] नाशिक जिल्ह्यातील मौजे पंचाळे येथे सप्ताह प्रवचन दरम्यान  रामगीरी  महाराज, सरला बेट यांनी मौजे पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक या ठिकाणी सप्ताहा दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरुची प्रतिमा मलीन होईल, तसेच जगाला शांतीचा संदेश देणारे प्रेषित यांच्या विरुध्द अभद्र आक्षेपार्ह वक्तव्य करुन जाणिवपूर्वक दोन समाजात तेढ निर्णाण करणाऱ्या रामगिरी गिरि महाराज व सरला बेट यांच्या विरुद्ध कडक कारवाई करून तात्काळ अटक करण्यात यानी अशी मांगणी तामगाव ठाणेदार यांच्या कडे एका निवेदनाव्दारे कवठळ येथील मुसलीम समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली
ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि
प्रेषित यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी सहा वर्षाच्या मुलीसोबत विवाह केला. ज्यांचे आदर्शच अत्याचारी आहेत, त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे? अशा स्वरुपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्ये रामगीरी  महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांनी केली आहेत. या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू-मुस्लिम या दोन समाजामध्ये  जातीय तणाव, धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे त्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिम धर्मियांविरोधात जाणुनबुजुन धार्मिक भावना दुखवुन जातीय दंगल घडविण्याच्या इराद्यात व्यक्तव्य करुन घेण्यात येत आहे ईस्तेमात फक्त इस्लाम विषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणुन कसे जगावे याबाबत शिकवण दिली जाते. कोणत्याही धर्म व जाती विरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्ये केली जात नाही. हि वस्तुस्थिती वास्तव असतांना भामट्या रामगीरी महाराजाने केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनातील एकोपा, सामाजिक बंधूभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. सध्या गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे. त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगीरी  महाराज, सरला बेट, ता. वैजापूर जि. औरंगाबाद यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्यात यावे अशी मांगणी तामगाव ठाणेदार यांच्याकडे कवठळ  येथील शेख अवेज , शेख शाहरुख , शेख शारिक शेख सोहिल , शेख नसिम , शेख उबेद , सैय्यद साजीद , सै शाकीर , महेमुद बेग , शेख रौशन , शेख शाहिर , शेख हुसेन , शेख राजीक , शेख करिम सह बहुसंखख्यांक मुसलीम समाज बांधवांनी दिलेल्या निवेदनातुन केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak