बालशिवाजी इंग्लिश स्कुल च्या विद्यार्थ्यांचे जिल्हा स्तरीय बॅाक्सिंग स्पर्धेत सुयश. जस्तगाव येथील वेदांत वसतकार ने कांस्य पदक पटकाविले

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बुलडाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय बॅाक्सिंग क्रीडा स्पर्धाचे संत नगरि शेगाव येथे दि ९ ते १० ऑक्टोंबर दरम्यान आयोजीत करण्यात आले होते त्यात १४ वय गट , १७ वय गट तसेच ४८ ते ५० किलो गट बॉक्सिंग क्रिडा स्पर्धेत संग्रामपुर तालुक्यातील वानखेड फाटा येथील विद्यार्थ्यानी १४ वय गट व १७ वर्षा आतील गटात दोन विद्यार्थ्यानी प्रत्येकी १ कांस्य पदक पटकाविले तर ४६ ते ४८ किलो वजन गटात रजत पदक पटकाविले जिल्हा स्तरीय बॅाक्सिंग क्रीडा स्पर्धा मध्ये संग्रामपूर तालुक्यातील बालशिवाजी इंग्लिश स्कुल वानखेड फाटा येथील १४ वर्ष आतील वयोगटात ३० ते ३२ किलो वजन गटात वेदांत कैलास वसतकार या विद्यार्थ्याने कांस्य पदक, तर ४८ ते ५० वजन गटात स्मित प्रफुल्ल पुंडे ने रजत पदक,
तर १७ वर्ष आतील वयोगटात ४६ ते ४८ किलो वजन गटात जानवी सतिष उन्हाळे ने कांस्य पदक पटकाविले.
प्रशिक्षक नागसेन इंगळे यांनी या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून तर विद्यार्थ्याना क्रिडा संदर्भात शाळेचे अध्यक्ष डॉ प्रविण पाटील व मुख्याध्यापक गायकवाड यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक शिक्षक नागसेन इंगळे , बाल शिवाजी इंग्लीश स्कुल सस्थेचे अध्यक्ष डॉ प्रविण चोपडे , मुख्यध्यापक गायकवाड सह आई वडिला यांना देतात बॉक्सिंग स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे बाल शिवाज ईंग्ली संस्थे
च्या वतीने सत्कार करण्यात आले यावेळी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते