Blog
बावणबीर येथे रामकथेचे समाप्ती निमित्त गावातुन मिरवणुक भावीकांना महाप्रसाद वितरण
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीर येथे दि २२ जुलै ते २८ जुलै दरम्यान हभप दिनेश महाराज वक्ते यांच्या मधुर वाणीतुन श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते आठ दिवस रामकथेचा कथा श्रवणाचा आनंद ग्रामस्थानी घेतला गावातुन मिरवणुक काढुन भावीकांना महाप्रसादाचे वितरण करित व रामकथेची समाप्ती करण्यात आली बावनबीर ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतुन हनुमान मंदिर बांधले व प्राणप्रतिष्ठा केली होती याप्रसंगी शेगाव येथील दंत चिकित्सक डॉ ओम अग्रवाल व उद्योजक शरदसेठ अग्रवाल यांनी जन्मगांव बावनबीर येथील हनुमान मंदिरला प्राणप्रतिष्ठे वेळी भेट दिली,
अग्रवाल बंधू यानी या मंदिरातील मूर्ती पाहिल्या नंतर प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येतील श्रीराम मुर्ती नंतर हीच मूर्ती त्याची प्रतिकृती दिसते म्हणून त्याच्या संकल्पनेतुन या निमित्ताने संगीतमय रामकथा चे आयोजन करण्याचे ठरविले व ह भ प श्री दिनेश महाराज वक्ते यांच्या मधुर वाणीतुन दि 22 ते 28 जुलै रामकथेचे आयोजन करण्यात आले होते
या वेळी बावनबीर ह मु शेगावचे यजमान डॉ ओम अग्रवाल, शरदसेठ अग्रवाल आणि बावनबीर येथील सहयजमान डॉ रविंद्र आकोटकार यांचा सहपरिवार, बावनबीर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होता या संपूर्ण रामकथेसाठी,विरभद्र हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.