बावनबीर येथे किडनीच्या आजाराने घरबांधकाम मिस्त्री शेख सादिक यांचा मृत्यू कुटुंब उघड्यावर
संग्रामपुर (प्रतिनिधी) तालुक्यातील बावनबीर येथील ५० वर्षीय घरबांधकाम कामगार मिस्त्री शेख सादिक शेख समद यांचा किडनीच्या आजाराने आज दि ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मृत्यू झाला वैधकिय निदानात त्यांना किडनी चा आजार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा पुतण्या डॉ कबीर यांनी दिली किडनी आजारावर गेल्या दिड वर्षा पासुन अकोला व शेगांव येथे उपचार सुरु होता मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न होता दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्यांचा अखेर आज मृत्यू झाला घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे दुपारी तीन वाजता त्यांच्यावर स्थानिक मुस्लिम कबरस्तानामध्ये दफन विधी करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आहे ते मन मिळावु स्वभावाचे होते त्यांच्या आकास्मीत मुत्यूने बावनबीर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ¢ शासनाने मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.