घटना
बावनबीर येथे ३१ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या दोन दिवसात दुसरी घटना समाज मनसुन्न !
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील बावनबीर येथील ३१ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२८ मे रोजी दुपारी घडली. मृतकाचे नाव संतोष शहादेव घाटोळे आहे. संतोषने राहत्या घरातच लोखंडी पाईपला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली संतोष हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनामुळे आई वडिल बहिनींना धक्का बसला असुन घाटोळे कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले अविवाहित युवकाने त्यात आई वडिलांना एकउलता एक दिवसा आड तालुक्यात दुसरी घटनेमुळे समाज मन सुन झाले आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची सोनाळा पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावरून पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात श्वविच्छेदन झाल्यानंतर संध्याकाळी संतोषवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनाळा पोस्टेलाठाण्यात अकास्मीत मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.