क्राईमघटना

बुलडाणा अर्बन पातुर्डा शाखेचे गोडाऊन फोडण्याचा प्रयत्न ३ ते ४ अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल श्वान पथका व ठसे तंज्ञा कडून तपासणी 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा ते पातुर्डा फाटा रस्त्यालगत असलेले बुलडाणा अर्बन पातुर्डा शाखेचे गोडाऊन फोडण्याचा प्रकार दि १६ फेब्रुवारीच्या रात्री ११ :३० वाजता दरम्यान  घडला
पातुर्डा गावापासुन एक किमी अंतरावर बुलडाणा अर्बन चे वेअर  हाऊस आहे. यामधे शेतकरी बांधवांचा शेतमाल तारण तत्वावर ठेवला जातो. 16 फेब्रुवारी चे मध्यरात्री च्या सुमारास अज्ञात  चोरट्यांनी पाठीमागुन ताराच्या सरंक्षण भिती वरुन चढून गोडाऊन परिसरात प्रवेश केला व टिनपत्रे उचकावून गोदामातील सोयाबीन व तूर चोरण्याचा प्रयत्न केला दि १७ फेब्रुवारी रोजी सकाळी हा प्रकार उघडकिस आला सदर घटनेची माहिती पोलीसांना समजताच   पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन तपासणी व पंचनामा केला आहे. यात काही चोरी गेलेले आढळले नाही. मात्र राज्य महामार्ग व त्यात नेहमी वर्दळीचा रस्ता असलेल्या गोडाऊन मध्ये चोरीचा प्रयत्न आश्चर्य व्यक्त होत आहे
तामगाव पोलीसांची पातुर्डा व परिसरातील गावात गस्त ची गाडी येण्यापूर्वीचा या गोडाऊन मध्ये चोरीचा प्रयत्न झाला गोडाऊन मध्ये कुत्रा सतत भुकत होता त्यामुळे चौकीदार यांना संश्य आल्याने गोडाऊनच्या पाठीमागे बॅट्रीक मारली असता अज्ञात व्यक्ती घटना स्थळा वरुन सरंक्षण भिंती वरुन पळून गेले कुत्र्यामुळे चोरांचा चोरीचा प्रयत्न फसला मात्र
शेतमाल असलेले हमरस्त्यावरील गोडाऊन फोडण्याचा प्रकार चिंतानाचा विषय आहे बुलडाणा अर्बन शाखा पातुर्डा बु  बॅक मॅनेजर राजेश व्दारकादास गांधी यांच्या लेखी फिर्यार्दी वरुन तामगाव पोलीसांनी ३ ते ४ अज्ञात आरोपी विरुध्द कलम अज्ञात ४ आरोपी विरुद्ध कलम ३८० , ४६१ , ४२७ , ५११ , ३४ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले तामगाव पोस्टेचे ठाणेदार  राजेंद्र पवार, यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास  पोहेकाॅ नंदकिशोर तिवारी, संदीप सोनोने करीत आहे
                        बॉक्स
झोया श्वानने पातुर्डा फाटा रसत्यावर दाखविली चोरांची वाट
बुलडाणा येथील श्वान आजारी असल्याने अकोला जिल्ह्यातील झोया डॉग नामक श्वान श्वान पथकाला पाचारण करण्यात आले घटना स्थळी चोरट्याचे चपला व १ जोडे याचा वास झोया डॉगने घेऊन गोडाऊन पासुन हाकेच्या अंतरावर पातुर्डा फाटा रसत्यावर  चोरट्यांची वाट दाखवली पुढे चोरटे वाहनात बसुन निघुन गेले श्वान पथकात पीएसआय अनिल जगताप , पो कॉ किरण अहिर व सहकारी श्वान झोया यांचा सहभाग होता
 गोडाऊनचे टिन पत्रे उचकावुन चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचे ठसे तज्ञ यांनी ठसे घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak