बुलडाणा जिल्हयातील संग्रामपुर तालुका अंतर्गत वरवट बकाल येथे सातपुडा वैदर्भीय दोन दिवशीय अ.भा. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन

संग्रामपुर (प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथे अ. भा. आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळाचे तिसरे वैदर्भीय आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित सातपुडा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था या संमेलनाचे आयोजन करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ भोजणे यांनी दिली सदर दोन दिवशीय संमेलन हे १६ मार्च व १७ मार्चला आयोजित करण्यात येणार आहे. अ भा आंबेडकरी साहित्य संम्मेलन संदर्भात सातपुडा प्रतिष्ठानच्या प्रमुख कार्यकर्त्यांची नियोजीत बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाच्या अध्यक्ष डॉ सीमा मेश्राम होत्या. यावेळी त्यांनी सुदृढ सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणासाठी साहित्य संमेलनाची आवश्यकता यावर प्रकाश टाकला तर महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे यांनी आयोजना संबधीत मार्गदर्शन केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून कार्यकर्ते यांनी कामाला लागावे असे आव्हान करण्यात आले यावेळी वामनराव ढगे, अमोल भिलंगे ,ॲड विश्वजीत वानखडे , सदानंद इंगळे अभयसिंह मारोडे ,शाहीर नागोराव इंगळे आदी साहित्य प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.