बुलढाण्यात धडाडणार शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरेंची तोफ
मतदारसंघात जयश्रीताई शेळकेंचे वादळ होणार तयार
बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा आपल्या प्रतिष्ठेची बाब करणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलुख मैदानी तोफ आज शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी बुलढाणा नगरीत धडाडणार आहे. या तोफांच्या माऱ्यात विरोधक पाला पाचोळ्यासारखे उडून जाण्याची चिन्हे आहेत. अभूतपूर्व ठरणाऱ्या या जंगी जाहीर प्रचार सभेमुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट तथा महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवार जयश्री सुनील शेळके यांचे वादळ तयार होणार आहे.बुलढाणा मलकापूर राज्य महामार्गावरील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी समोरील विशाल मैदानात उद्या 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही अभूतपूर्व प्रचार सभा लावण्यात आली आहे. गद्धाराना गाडण्यासाठी आणि बुलढाण्यातून हद्धपार करण्याचा दृढ निर्धार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.
तसेच कोणत्याही परिस्थितीत बुलढाण्यात मशाल जिंकानारच असा चंग शिवसैनिकांनी बांधलाय. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिकांनी तसा निर्धार केला आहे. या निर्धाराला अनुसरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या राज्यव्यापी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा दिली आहे. बुलढाण्यातील या प्रचार सभेत त्यांच्या समवेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख शिलेदार,नेते उपनेते हजर राहणार आहे. ही सभा विक्रमी करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, काँग्रेसचे नेते राहुल भाऊ बोंद्रे, हर्षवर्धन सपकाळ ,एडवोकेट गणेश पाटील, सुनील सपकाळ, प्राध्यापक डी एस लहाने, नरेश शेळके, लखन गाडेकर, यांच्यासह बुलढाणा आणि मोताळा तालुक्यातील समस्त पदाधिकारी, तालुका प्रमुख, उप प्रमुख, शहर आणि विभाग प्रमुख यांच्यासह बुलढाणा विधानसभा मतदार संघातील हजारो शिवसैनिक, मावळे जीवाचे रान करीत आहे. शिवसेना व आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सभेचा झंझावाती प्रचार करण्यात आला. मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील जाहीर सभा विक्रमी व्हावी यासाठी परिश्रम घेत आहे.
ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष
दरम्यान आतापासूनच ही सभा विक्रमी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असून ठाकरेंच्या ‘हिट लिस्ट’वर कोण असणार याकडे संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लक्ष वेधले आहे. प्राप्त माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या रडारवर गद्धार नेतेच असल्याचे वृत्त असून ते विरोधकांवर कोणत्या भाषेत टीका करतात, ठाकरे स्टाईल मध्ये कसा भडिमार करतात अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ऐतिहासिक सभेला हजारोचा संख्येने हजर रहा: बुधवत
दरम्यान या सभेसंदर्भात विचारणा केली असता आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके म्हणाल्या की बुलढाण्यात शुक्रवारी होणारी सभा उपस्थितीचे सर्व रेकॉर्ड तोडणारी ठरणार आहे. तसेच गद्धारी करून बुलढाणा मतदारसंघात हुकूमशाही, दंडेलशाही आणि दादागिरी करणाऱ्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे. यामुळे या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी बुलढाणा मतदारसंघातील आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी आणि नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर भाऊ बुधवत यांनी केले आहे