क्रीडामहाराष्ट्रविशेष बातमी

भारतीय संघा कडून आट्यापाट्या खेळलेल्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप शिवाजी डाखोकार यांचा सातपुडा संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ स्वातीताई वाकेकर व डॉ संदिप वाकेकर यांनी केला सत्कार

बुलडाणा [ प्रतिनिधी ] आशिया खंडातील भूतान या देशात भारत , बांगलादेश भुतान श्रीलंका या देशाअंतर्गत झालेल्या आट्यापाट्या स्पर्धेत भारतीय आट्यापाट्या संघात वरवट बकाल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रदीप शिवाजी डाखोकार हा विद्यार्थी भारताकडून अंतरराष्ट्रीय आट्यापाट्या संघाकडून खेळला व भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. सदर स्पर्धा भुतान येथे दिनांक 13 14 व 15 सप्टेंबर येथे पार पडली. त्यामध्ये भारतीय संघाला सुवर्णपदक प्राप्त झाले.
आशिया खंडातील भारत, श्रीलंका भूतान, बांगलादेश या सर्व देशांर्तगत या स्पर्धा संपन्न झाल्यात. या भारतीय आट्यापाट्या संघामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थी प्रदिप शिवाजी डाखोकार याचा सातपुडा शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर व डॉ.संदिपजी वाकेकर यांनी सत्कार करुन अभिनंदन केले. प्रदीपने फक्त वरवटच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचेच नाव मोठे केले त्यासोबत आपल्या परिसराचेही नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिडा स्पर्धां मध्ये मोठे केले. त्याबद्दल प्रदीप सोबत कुटुंबाचे तसेच सर्व प्राध्यापक वृंदाचे अभिनंदन कोषाअध्यक्ष डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी केले.
यावेळी प्रदीपने सत्काराला उत्तर देतांना मी सदैव या महाविद्यालायाच्या ऋणात राहील असे सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष पवार, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा.डॉ. गजानन पैकट, प्रा.डॉ.सुभाष गुर्जर, प्रा.डॉ.निशीगंध सातव, प्रा राजेन्द्र कोरडे , प्रा.पंकज तायडे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak