महाबोधी महाविहार वरील परकीय ब्राह्मणांचा अवैध कब्जा हटवण्यासाठी देशव्यापी जेलभरो आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे बुलडाणा जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कोकाटे

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] बिहार राज्यातील बुद्ध गया येथे महाबोधी महाविहार सम्राट अशोकाने निर्माण केले होते. बुद्धाच्या काळातच या ठिकाणी त्याचे महत्त्व वाढले होते. बिहार येथील बुद्धगया तथागत बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे. सम्राट अशोकाने त्याला संबोधी म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच काश्मिरी ब्राह्मण यांनी ही जागा ब्राह्मणांसाठी ताब्यात घेण्याची योजना आखली. महंत ब्राम्हणांनी ब्राह्मणांनी कायदा करून बौद्धगया काबीज केले आहे महाबोधी महाविहार वरील परकीय ब्राह्मणांचा अवैध कब्जा हटवण्यासाठी संपुर्ण भारत भर जेलभरो आंदोलनात होत आहे त्यांचाच एक भाग म्हणुन बुलडाणा येथे दि ९ एप्रिल रोजी जेलभरो आंदोलनात बुध्दप्रेमि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कोकाटे यांनी प्रसिद्ध पत्रकाव्दारे केले आहे प्रसिध्द केलेल्या पत्रका मध्ये नमुद आहे कि महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949 तयार करून ब्राम्हणांना महाबोधी महाविहार चे मालक दाखवण्यात आले आहे . ९ सदस्यांपैकी ५ सदस्य हे ब्राह्मण आहेत. हिंदूंच्या नावाखाली महाबोधी विहारावर ब्राह्मणांचा अवैध कब्जा आहे. हा अवैध कब्जा हटवण्यासाठी महाबोधी महाविहार मंदिर कायदा 1949 रद्द करणे आवश्यक आहे . ब्राह्मणांनी त्यांच्या वैदिक धर्मग्रंथांमध्ये मगध प्रांताला (त्यात बौद्धगयाचाही समावेश होतो) अपवित्र म्हटले आहे ,एवढेच नव्हे तर ब्राह्मणांनी मृत्यू शिवाय कोणतेही प्रायश्चित नाही पद्मपुराणात बुद्धांचे मुख पाहणे पाप मानले गेले आहे. परकीय ब्राह्मणांना ती जागा बुद्ध का ताब्यात घ्यायचे आहे? तर शंकराचार्यांच्या अनुयांयांना त्यांच्या धार्मिक ग्रंथानुसार तिथे जाण्यास मनाई आहे. न्यायमूर्ती मॅक जेफरस्न ले यांनी 1895 मध्ये महाबोधी महाविहार वादावर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की महाबोधी महाविहार ते मुळात बौद्ध धर्माचे पवित्र स्थान आहे यावरून वैदिक ब्राह्मणांचे नियंत्रण हटवले पाहिजे या आंतरराष्ट्रीय वारसाची बदनामी करण्यासाठी भंते प्रज्ञाशील जे उच्चवर्णीय आहेत आरएसएस सारख्या दहशतवादी संघटनेची हात मिळवणी करून अयोध्येत राम मंदिर बनण्यासाठी बुद्धांच्या पवित्र स्थानाची माती पाठवली याचा अर्थ बौद्ध गया व्यवस्थापकीय समिती ही या कटात सामील आहे आणि महंत ब्राह्मण आणि BIMC बुद्ध गया या समितीच्या आदेशानुसार कार्यरत आहे हे सिद्ध झाले आहे . महाबोधी महाविहार यावरील वरील परकीय ब्राह्मणांचा अवैध कब्जा हटवण्यासाठी देशव्यापी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची गरज आहे . बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्यामुळे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मूलनिवासी बहुजन समाजातील समाज बांधव, बुद्धिजीवी वर्ग, विद्यार्थी,उपासक,उपासिका समविचारी संघटनांनी या होणाऱ्या चरणबद्ध आंदोलनामध्ये तन मन धनाने सहकार्य करावे उद्या दिनांक ९ एप्रिल बुधवार ला बुलढाणा येथे होऊ घातलेल्या देशव्यापी जेल भरो या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आव्हान बुलढाणा जिल्ह्यातील बुद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कोकाटे यांनी केले.