महाराष्ट्रविशेष बातमी
मुंबई येथे २८ जुनला विधानभवनावर ग्रा पं कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहा ग्रा पं कर्मचारी युनियन राज्य सचिव अशोक कुथे यांचे आव्हाण
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्यातील ग्रा.पं. कर्मचारी युनियनचे वतीने शासनास अनेक वेळा निवेदन दिलीत. प्रत्येक वेळी प्रत्यक्ष भेटी घेतल्यात. फक्त आश्वासन मिळाले .परंतु अजूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने मंजूर केल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी संताप व्यक्त करीत आहेत. काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळत नसल्याने व राहणीमान भत्ता मिळत नसल्याने ग्रा.पं.कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी शासनाला जाग आली नाही. अखेर म. रा. ग्रामपंचायत कर्मचारी युनियन र.नं ४५११ च्या वतीने विविध मागण्यांसाठी येत्या दि. २८ /जून रोजी आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करून मुंबई विधानसभा मोर्चा धडकणार आहे. त्याकरीता ह्या भव्य मोर्चामध्ये राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन म.रा.ग्रा.पं. कर्मचारी युनियनचे राज्य सचिव अशोक कुथे यांनी केले आहे.
राज्यातील २७ हजार ९२० ग्रा.पं,मध्ये काम करीत असलेल्या सुमारे ६० हजार कर्मचाऱ्यांचे वेतनाचा प्रश्न मागील वीस वर्षापासून प्रलंबित आहे. याबाबत ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी १०/ जुलै २०१८ ला नागपूर येथे लॉंग मार्च काढला. त्यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री यांनी मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन दिली होती. तसेच ७ / जानेवारी / २०१९ ला लातूर येथे भव्य अधिवेशन आयोजित केले होते. त्यावेळीही ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री यांनी अधिवेशनास उपस्थित राहून मार्गदर्शन केले व आश्वासने दिले होते. परंतु त्याची फलश्रूती काहीच झाली नाही. त्यामुळे दि. ९ / मार्च २०२२ रोजी मानकोली येथून आझाद मैदान मुंबई ते धडक मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर २६ / डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे भव्य राज्यस्तरीय अधिवेशनात . मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व बच्चू कडू इतर आमदारासह उपस्थित राहून आश्वासन देवूनही अद्याप ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. आता तर वेतनही लवकर मिळत नाही. आणि पूर्वी पेक्षाही कमी वेतन येत आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व आक्रोश निर्माण झाला आहे अखेर येत्या २८ / जून /२०२४ला ग्रा.पं, कर्मचारी युनियन ४५११ चे माजी राज्याध्यक्ष तथा मार्गदर्शक व नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील ,आमदार कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू ,राज्य सरचिटणीस गिरीश दाभाडकर, राज्य कार्याध्यक्ष काजी अल्लाउद्दीन, राज्य मार्गदर्शक रामेश्वर गायकी, धनराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात ग्रा.पं, कर्मचाऱ्यांचा मुंबई आझाद मैदान येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. आहे तरी राज्यातील सर्व ग्रा.पं. कर्मचाऱ्यांनी ह्या आक्रोश मोर्चात आपले हिता करीता व न्याय मिळण्या करीता उपस्थित राहावे ,असे आवाहन राज्याचे सचिव अशोक कुथे(नागपूर) व राज्य संघटक डिगांबर सोनटक्के यांनी केले आहे.
बॉक्स
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या.
ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना नगरपरिषद व जि. प. कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करणे, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे, किमान वेतनाच्या अनुदानाची १९ महिन्याची थकीत एरियास रक्कम मिळणे, भ.नि,निनिधीची रक्कम कामगार भ.नि.नि. संघटन (ईपीएफ) या कार्यालयात जमा करणे, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत असलेली वसुलीची अट रद्द करणे, आकृती बंधात सुधारणा करणे, दहा टक्के आरक्षणानुसार भरती करत असतांना दरवर्षीचे रिक्त पदावर अनुकंपांचे धरतीवर पद भरती करावी., सर्व जि.प.मध्ये नियमित व एकाच नियमाच्या आधारावर भरती करणे. सद्यस्थितीत काही जि.प.चे मध्ये वेगवेगळे नियम लावून मूळ शासन निर्णयास बगल देण्यात आहे. ती दूर करणे.
आदी विविध मागाण्या शासनाने मंजूर करुन न्याय द्यावा