घटना

मुले चोरटी असलेल्या संश्यीत महिलेला पातुर्डा खुर्द ग्रामस्थांनी पकडले पोलीसांच्या चौकशीत मनोरूग्ण असल्याचे निष्पन्न

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील शिकवणी वर्गातुन घराकडे जात असतांना डिगांबर वाघ यांच्या घरा समोर साडी घातलेल्या अज्ञात अंदाजे २२ वर्षीय महिलेने पातुर्डा खुर्द येथील श्याम म्हसाळ यांच्या ६ वर्षीय साई श्याम म्हसाळ यांचा हात पकडून घेऊन जात असतांना सोबत असलेल्या साई म्हसाळची बहिण व परिसरातील महिलांनी आरडा ओरड केल्याने नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत मुले चोरट्या अज्ञात संश्यीत महिला रंगेहाथ पकडून ग्रामस्थांनी सदर महिलेला चोप देत पातुर्डा पोलीस चौकीत आणले पोलीस चौकी बंद असल्याने दिर्घ काळ बसवुन ठेवत तामगाव पोलीसांना सुज्ञ नागरिकांनी माहिती दिल्यावर पोलीस उपनिरिक्षक विलास बोपटे शासकिय वाहना सह घटना स्थळी पोहचले व मुले चोरट्या संश्यीत महिलेला ताब्यात घेऊन तामगाव पोस्टे कडे जात असतांना नागरिकांनी घेराव घातला त्यामुळे पोलीसांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला वृत लिहे पर्यत म्हसाळ कुटुंब नातेवाईक पातुर्डा खुर्द ग्रामस्थ तामगाव पोलीस स्टेशन ठाण मांडून बसले होते सदर महिलेची चौकशी केली असता स्वताच्या गावाचे नाव माहिती नाही व हिंन्दी तोडकी बोलता येते प्रश्नाचे योग्य उत्तर न देता मनाने बडबड करित असल्याने मनोरुग्ण असल्याची माहिती तामगाव पोलीसांनी दिली ग्रामस्था मध्ये पुरुष असल्याची चर्चा पोलीस प्रशासनाने महिला पोलीस कर्मचारी करवी संबंधीत संश्यीत महिलेची तपासणी केली असता स्त्री असल्याचे निष्पन्न झाले ग्रामस्थांच्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला संबंधीत संश्यीत महिलेची तामगाव पोस्टे कडून बुलडाणा येथील सखी वन स्टॉप केंन्द्रात रवानगी केली होती मात्र त्यांनी सदर मनोरुग्ण महिलेला घेण्यास नकार दिल्याने उद्या मनोरुग्ण महिलेला तामगाव पोलीस घेऊन जाणार व चिखली तालुक्यातील पळसखेड येथील सखी केंन्द्रात दाखल करण्यात येईल अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उप निरिक्षक विलास बोपटे यांनी दिली

वान नदि काठावर पातुर्डा खुर्द स्मशान भुमित अज्ञात ३ ते ४ ईसम दबा धरून बसले होते ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेताच नेकनामपुर रसत्याने पळून गेले

वान नदि काठावर पातुर्डा खुर्द शिवारात स्मशान भुमित दि १० सप्टेंबर रात्री १२ वाजता दरम्यान ३ ते ४ अज्ञात व्यक्ती दबा धरुन बसले असल्याचे दोन्ही गावातील १०० च्या वर नागरिकांनी घटना स्थळी धावले अज्ञात व्यक्तीनी जमावाला पाहून त्यांनी नेकनामपुर रसत्यांने धुम ठोकली त्यांच्या मागे युवक गेले असता नेकनापुर रसत्याने बोराखडे यांच्या मळ्यात घुसले युवकांनी शोध घेतला असता अंधाराचा फायदा घेत पळून गेले सदर घटनेची माहिती तामगाव पोस्टेला दिल्यावरून ठाणेदार राजेन्द्र पवार यांनी पोलीस कर्मचारी यांना पाठविले परिसरात शोध घेतला मात्र अज्ञात ईसम मिळून आले नाही पातुर्डा बु व पातुर्डा खुर्द गावातील युवकांनी रात्र जागुन काढली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak