मुस्लिम बांधवांची साथ आयुष्यभर सोडणार नाही : नरेंद्र खेडेकर बुलडाणा जिल्ह्याचा मुस्लिम समाज निष्ठे सोबत धर्माचं राजकारण आता बुलडाण्यात होणार नाही
बुलडाणा : राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांची ही भूमी, या भूमीने शिवरायांना स्वराज्याचा स्वप्न दिलं. शिवरायांनी ते साकार करून दाखवलं. या जन्मभूमीत धर्माचं – जातीपातीचे राजकारण करून समाजाची दिशाभूल करून बुलडाणा जिल्ह्याला मागास ठेवणाऱ्या प्रस्थापितांना आता जनता भुलणार नाही, असे प्रतिपादन महाविकास
आघाडीचे उबाठा गटाचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी केले.
बुलडाणा शहरातील इक्बाल चौक येथील सर्व मुस्लिम बांधवांनी मला समर्थन देत पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी माझ्या प्रती दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही. सामाजिक ऐक्याचा मुस्लिम बांधवांनी संदेश देत सत्याच्या आणि निष्ठेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुस्लिम बांधवांची ही साथ आयुष्यभर विसरणार नाही, हे माझे वचन आहे.
याप्रसंगी जयश्रीताई शेळके, नरेश शेळके, नगराध्यक्ष सज्जाद सेठ , झाकीर कुरेशी, अमीन टेलर, नदीम भाई, सत्तार कुरेशी, अफजल शेख, साबेर कुरेशी, युनूस कुरेशी, गुड्डू मिर्झा, अश्फाक बागवान, अनिस बागवान, सलीम हाजी, इजहार देशमुख, मोमीन काजी, सय्यद आसिफ, जावेद खान, मुख्तार शहा, बाबा चौधरी, शेख परवेज यांच्यासह सर्व स्थानिक मुस्लिम बांधव व महविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी, नागरिक व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.