महाराष्ट्रविशेष बातमी

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मार्फत कर्ज योजनाअंतर्गत नव्याने अर्ज स्विकारणे सुरु गरजु लाभार्थ्यानी लाभ घ्यावा मौलाना आझाद विचार मंच हाजी मुज़म्मील खान यांचे आव्हान

 

संग्रामपुर [प्रतिनिधी ] महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचे मागासलेपण दूर करुन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बार्टी धर्तीवर मार्टीला कॅबिनेटची मंजुरी ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे ‘एमआरटीआय’ची स्थापना करण्याचा राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाने निर्णय घेतला त्यात महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम तसेच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी अल्पसंख्याक समाजाचे नेते खा हुसेन दलवाई यांचा सतत पाठपुरावा व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते
अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा ३० कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना २०२४-२५ पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी, यावर्षी मंत्रिमंडळ बैठकीत अल्पसंख्याक आयुक्तालय तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ‘अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था’ ‘एमआरटीआय’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुसलीम अल्पसंख्यांक समाज बांधवाचा मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण ६ कोटी २५ लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्यातील मुसलीम समाज बांधव तसेच अल्पसंख्यांक मुख्य प्रवाहात येऊन त्यांचा सर्वागींण विकासाला चालना मिळावी म्हणुन मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ राज्य शासना कडून भागभांडवल स्वरुपात प्राप्त होणाऱ्या निधीतुन मौलाना आझाद शैक्षणीक कर्ज योजना राबविण्यात येते तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास एव वित्त निगम नई दिल्ली यांच्या कडून कर्ज स्वरुपात प्राप्त होणाऱ्या प्राप्त होणाऱ्या रकमेतुन मुदत कर्ज योजना , सुक्ष्म पतपुरवठा योजना , व डॉ ए पी जी अब्दुल कलाम शैक्षणीक योजना कर्ज योजना राबविण्यात येत असुन , या सर्व कर्ज योजने अंतर्गत नव्याने अर्ज स्विकारले जात असल्याने शैक्षणीक कर्ज योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज वर्ष भर स्विकारण्यात येत आहे तसेच मुदत कर्ज योजना तसेच सुक्ष्म पतपुरवठा योजना या योजने अंतर्गत मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयात दि २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर दरम्यान अर्ज स्विकारण्यात येत असल्याने गरजु लाभार्थीनी लाभ घ्यावा अधिक माहिती साठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान मौलाना आझाद विचार मंचचे हाजी मुज़म्मील खान यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak