युवा उद्योजक अमोल व्यवहारे राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योगरत्न गौरव पुरस्काराने सन्मानीत
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील उकळी बु येथील रहिवासी शेतकरी पुत्र जिजाऊ गृह उद्योग संचालक जिल्हाध्यक्ष प्रतिभा साहित्य संघ बुलढाणा अमोल मोतीराम व्यवहारे यांना मराठी ॲक्ट्रेस व मराठी मालिका भाग्य दिले तू मला कलाकार विदिशा म्हसकर यांच्या हस्ते नुकत्याच पार पडलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरूड गावी महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार २०२४ देऊन सन्मानित करण्यात आले. अमोल व्यवहारे यांनी ग्रामीण भागातील बेरोजगारांना उद्योजकीय मानसिकता परिवर्तन व्हावा या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करणे विविध कार्यशाळा राबविणे नेहरू युवा केंद्र बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले त्या माध्यमातून बऱ्याच बेरोजगार युवकांनी प्रेरणा घेऊन स्वतः स्वयंरोजगार उभारले परिसरातील कित्येक युवकांनी आदर्श घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे काम केलं कलाजिवन बहु उद्देशिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.युवराज ठाकरे यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.यावेळी चंद्रपूर येथील याहुवा यिरे फाउंडेशनचे सी ई ओ डॉ.रमेशकुमार बोरकुटे , अध्यक्ष कु. येथिया बोरकुटे व लायन्स क्लब चे अध्यक्ष तसेच सर्व सभासद यांची प्रमुख उपस्थिती होती.या पुरस्कारासाठी इरा किड्स स्कूल कळमेश्वर च्या प्राचार्या सौ.शिला निमकर, इरा इंटरनॅशनल स्कूल ब्राम्हणवाडा प्राचार्या. शारदा नेरकर सह सर्व उपस्थित उद्योगपतींनी अमोल व्यवहारे यांचे कौतुक केले मातृतिर्थ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या संग्रामपुर तालुक्यातील उकळी बु या छोट्याश्या खेडे गावातुन युवा उद्योजक अमोल व्यवहारे यांना राजस्तरीय महाराष्ट्र उद्योग रत्न गौरव पुरस्कार मिळाल्याने जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असुन त्यांचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे