महाराष्ट्रविशेष बातमी

यूजीसी नेट परीक्षेत शेख मतीन शेख नजीर यांचे सुयश

असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडीसाठी निवड

बुलडाणा : जि.प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा देऊळघाट, पंचायत समिती जि.प. बुलडाणा येथे शेख मतीन शेख नजीर कार्यरत आहे. सहाय्यक अध्यापक शेख मतीन शेख नजीर यांची यूजीसी नेट परीक्षेत इंग्रजी विषयात असिस्टंट प्रोफेसर व पीएचडीसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांनी आपला, आपल्या कुटुंब, शाळेचे व गावाचे नाव उंचावले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने UGC नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) जून 2024 चा निकाल 17 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर झाला. युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन (UGC) च्या वतीने घेण्यात येणारी ही परीक्षा भारतीय नागरिकांची पात्रता ठरवते. ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF), सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती आणि पीएच.डी. परीक्षेसाठी 11 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये केवळ 6.84 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यापैकी, 4970 उमेदवार जेआरएफसाठी, 53,694 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आणि 1,12,070 उमेदवार पीएच.डी.साठी पात्र ठरले. UGC NET जून 2024 ची परीक्षा भारतातील 280 शहरांमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये घेण्यात आली. ही परीक्षा 21 ऑगस्ट 2024 ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंत 11 दिवसांची होती. ज्यामध्ये 21 शिफ्टमध्ये 83 विषयांचा समावेश होता. यामध्ये शेख मतीन शेख नजीर यांची यूजीसी नेट परीक्षेत इंग्रजी विषयात असिस्टंट प्रोफेसर व पीएचडीसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंब, मित्र, शिक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak