महाराष्ट्र

राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्त जनजागृतीपर विविध कार्यक्रम संपन्न

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे राष्ट्रीय सेवा योजना, मतदार साक्षरता मंडळ व तहसील कार्यालय संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमात निबंध स्पर्धा, पोस्टर कॉम्पिटिशन, रांगोळी स्पर्धा तसेच भव्य रॅली आयोजन करण्यात आले होते. आयोजित भव्य मतदान जनजागृती रॅली ही महाविद्यालय परिसर ते वरवट बकाल फाटा दरम्यान काढण्यात आली. रॅली मध्ये विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती संबंधी विविध घोषणा व नारे दिले. यानिमीत्त आयोजित रांगोळी व पोस्टर स्पर्धेचे अवलोकन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर व सर्व उपस्थित प्राध्यापकांनी केले. विद्यार्थ्यांसाठी मतदार जागृती मार्गदर्शन कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर यांचे मार्गदर्शनामध्ये लाभले त्यानंतर  मतदारांसाठी प्रतिज्ञा वाचन करण्यात आले. ऑगस्ट महिण्यात घेण्यात आलेल्या मतदार जागृती विषयावरील रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेचे प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ राजेंद्र कोरडे, आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ.संजय टाले, प्रा.डॉ.मेघा सोळंके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश भालतडक, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी हिंगणकर, सह-कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश शेळके, प्रा. शिवशंकर खंडेराव यांच्यासह महविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
                            बॉक्स
तालुक्यात तहसिल कार्यालय निर्वाचन विभागाच्या वतीने शालेय महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले यावेळी निर्वाचन अधिकारी पल्लडवार , लिपीक जी पी ठाकरे , कर्मचारी गोपाल बोंबटकार उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *