रियाज अन्वर बुलडानवी यांच्या बाल काव्य संग्रहाचे प्रकाशन बुलढाणा

बुलढाणा :- हिंदु मुस्लिम एकता मंच व सहर ए गजल अकाॅडमी बुलढाणाच्या संयुक्त विद्दमाने आंतरराष्ट्रीय कवी रियाज अन्वर बुलडानवी यांच्या बालकाव्य संग्रह समनजारचे प्रकाशन प्रसिध्द उर्दू शायर डाॅ.गणेश गायकवाड यांच्या हस्ते पार पडले.
अध्यक्ष स्थानी कवी मुस्तकीम अर्शद होते. सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अ.समद शेख चांद व डॉ.सदानंद देशमुख बीरोमासकर यांची प्रमुख उपस्थिति होती. डॉ.गायकवाड हॉस्पिटलच्या सभागृहात सदर प्रकाशन सोहळा पार पडला. प्रकाशन सोहळ्यानंतर कवि सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात नकीब अकोलवी, डॉ. आगाज़, आरिफ जमा बालापूरी, करीम दुर्वेश वाशिम, नाज पुरवाई अमरावती, अनस नबी अकोला, इमरान सानी बुलडानवी, शाद रायपूरी, तन्हा देवलघाटी, यूसुफ फलाही डोणगांवी, कली खौफ चिखली, आसिफ़ मुनव्वर बुलडानवी, उमर बुलडानवी, समीर फराज बुलडानवी यांनी आपल्या शायरी ने श्रृत्यांना मंत्रमुग्ध केले. संचालन मुनव्वर जमा तर आभार प्रदर्शन आयोजक सै.आसिफ यांनी केले.