
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] सातपुड्याच्या कुशित वसलेल्या आदिवासी बहुल चिचारी या गावातील अंदाजे ३२ वर्षीय युवकाला श्वासचा त्रास झाल्याने गावात वाहनाची सुविधा नसल्याने शासकिय वाहन १०८ ला दुरध्वनी व्दारे माहिती दिली परंतु बराच वेळ झाल्या नंतर ही १०८ उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांनी बरकत भारसाकळे या युवकाला खाजगी वाहनाने खाजगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर सईबाई मोटे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने योग्य सुविधा अभावी सर्वउपचार रुग्णालय अकोला येथे हलविण्यास आरोग्य विभागाचे रूग्ण वाहतुक वाहन अभावी योग्य उपचार वेळेवर न मिळाल्याने अखेर बरकत अब्दुल भारसाकळे या युवकाचा दुदैवी मुत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मृतक बरकत भारसाकळे यांच्या कुटुंबावर दुखाचे डोंगर कोसळले असुन त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे बरकतच्या आकास्मित मुत्यूने चिचारी सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे