रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कोतवाल अस्वार यास चिरडले उपचार दरम्यान मृत्यू आरोपी तामगाव पोलीसांच्या ताब्यात

संग्रामपूर [प्रतिनिधी] महसुल विभागावर पाळत ठेऊन लोकेशन घेऊन तालुक्यात अवैध रेती तस्करी सर्रास केली जात आहे अवैध रेती वाहतुक रात्री केली जाते अवैध रेती उत्खलन करुन वाहतुक केली जात असल्याच्या गोपनीय माहिती वरुन महसुल कर्मचारी कोलद वाननदि पुलावर दाखल झाले तेव्हा अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टर ला थांबविण्याचा प्रयत्न केले असता सदर ट्रक्टर न थांबविता कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार रा एकलारा बानोदा यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने अवैध रेतीने भरलेला ट्रक्टर अंगावरून नेल्याने त्यात कोतवाल अस्वार गंभीर जखमी झाल्याने उपचार दरम्यान त्यांचा दुदैवी मुत्यू झाल्याची घटना आज दि १७ एप्रिल रोजी उघडकीस आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली खळद येथील आरोपी संतोष पारिसे विरूध्द तामगाव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले असुन आरोपी फरार असल्याची माहिती तामगाव पोलीसांनी दिली
याबाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तालुक्यातील कोलद वान नदि पात्रातुन अवैध रेती उत्खलन करुन अवैध रेतीची ट्रक्टर व्दारे वाहतुक सुरू असल्याची माहिती गुप्त माहिती वरुन संबंधीत तलाठी कोतवाल सह घटना स्थळी पोहचले असता या ठिकाणी कोलद वाननदि पुला वरून अवैध रेती वाहतुक करतांना ट्रक्टर दिसले सदर वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक्टर चालक संतोष पारीसे यांने सदर अवैध रेतीचा ट्रक्टर कोतवाल लक्ष्मण अस्वार वय ४० वर्ष रा काटेल कोलद यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अंगावरून ट्रक्टर नेऊन गंभीर जखमी करून जिवे मारुन टाकले व ट्रक्टर घेऊन पळून गेला हि घटना १६ एप्रिल रात्री साडे आठ वाजता घडली अशी फिर्याद तामगाव पोलीसात फिर्यार्दी देवेंन्द्र श्रीकृष्ण बोडखे यांच्या फिर्यार्दी वरून आरोपी संतोष पारिसे विरुद्ध कलम ३०७ , ३०२ , ३७९ , ३५३ , भादवि सह कलम २१ ( १ ) खाण व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले व आरोपी संतोष पारिसे ला तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पी एस आय विलास बोपटे करित आहे