घटना
लाडणापुर येथे २० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या सोनाळा पोस्टे अंतर्गत एका महिण्यात तिसरी घटना
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन लाडणापुर येथे २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्याचे कारण कळू शकले नाही मृतकाचे नाव किशोर श्रीकृष्ण अहिर आह या बाबत थोडक्यात हकीकत अशा प्रकारे आहे लाडणापुर येथे गावातील नातेवाईक मृतक किशोर अहिर या युवकाच्या घरी सकाळी अंदाजे १२ वाजता गेले असता २० वर्षीय किशोर अहिर रा लाडणापुर हा राहत्या घरात गळफास घेऊन मृत अवस्थेत आढळला नातेवाईक भगवान पवार यांनी सोनाळा पोलीसांना सदर घटनेची माहिती दिल्या वरुन सोनाळा पोलीस घटना स्थळी दाखल झाले पंचनामा करुन वरवट बकाल ग्रामीण प्रेतचा श्वविच्छेदन झाल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले नातेवाईक भगवान पवार यांच्या फिर्यार्दीवरुन वरुन सोनाळा पोस्टेला मर्ग दाखल करण्यात आला सोनाळा पोस्टेचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास मोहनसिंग पवार करित आहे सोनाळा पोस्टे अंतर्गत आदिवासी बहुल भागात या पुर्वी २ व आज १ अशी आत्महत्याची ३री घटना असुन चिंतनाचा विषय असुन समाज मन सुन्न झाले असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे