राजकीय

लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांचे नामांकन

बुलडाणा, दि. 4 : बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान आज 17 उमेदवारांनी त्यांचे नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सादर केले. आज नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती.

आज बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी 5 जणांनी 5 अर्जाची उचल केली. दरम्यान आज 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत 62 जणांनी 137 अर्जाची उचल केली होती. यातील 29 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. आज गजानन जर्नादन धांडे – अपक्ष, नरेंद्र दगडू खेडेकर – शिवसेवा उद्धव बाळासाहेब ठाकरे, ज्ञानेश्वर पुरूषोत्तम पाटील – अपक्ष, सचिंद्र शेषराव मघाडे – सोशालिस्ट पार्टी इंडिया, दिपक भानुदास जाधव पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमॉक्रॅटीक, शाम बन्सीलाल शर्मा – अपक्ष, अशोक वामन हिवाळे – अपक्ष, नामदेव दगडू राठोड – अपक्ष, वसंत राजाराम मगर – वंचित बहुजन आघाडी, संतोष भिमराव इंगळे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर, दिनकर तुमाकार संबारे – अपक्ष, विकास प्रकाश नांदवे – भिमसेना, बाळासाहेब रामचंद्र इंगळे – बहुजन संघर्ष सेना, गौतम किसनराव मघाडे – बसपा, विलास शंकर तायडे – बहुजन समाज पार्टी, ॲड. सैयद मुबीन सैय्यद नईम – अपक्ष, माधवराव सखाराम बनसोडे बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टी या उमेदवारांनी आज नामांकन अर्ज दाखल केले.

याआधी संजय रामभाऊ गायकवाड – शिवसेना, विजयराज शिंदे – भाजप, प्रतापराव जाधव – शिवसेना, रविकांत चंद्रदास तूपकर – अपक्ष, रेखा कैलास पोफळकर – अपक्ष, प्रताप पंढरीनाथ पाटील – बहुजन मुक्ती पक्ष, महंमद हसन इनामदार – मायनॉरिटी डेमोक्रॅटीक पार्टी, सूमन मधुकर तिरपुडे – पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, संदीप रामराव शेळके – अपक्ष, नंदू जगन्नाथ लवंगे – अपक्ष, उद्धव ओंकार आटोळे – अपक्ष यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना दि. 28 मार्च रोजी प्रसिद्ध झाली आहे. आज इच्छुकांनी दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामांकन अर्ज सादर केले. दाखल करण्यात आलेल्या सर्व 29 नामनिर्देशन पत्रांची शुक्रवारी, दि. 5 एप्रिल रोजी छाननी करण्यात येणार आहे. तसेच दि. 8 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak