लोणार ग्रामीण रुग्णालयातील घटनेस जबाबदार दोषी वर कडक कार्यवाही करणार :- केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव
लोणार प्रतिनिधी :- दिनांक २३ डिसेंबर च्या सकाळी ३.३० वाजेदरम्यान लोणार ग्रामीण रुग्णालयाच्या वॉर्ड मध्ये कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षक यांना धूर दिसून आला त्यांनी लगेच वॉर्ड बॉय यांना या बाबत माहिती दिली वॉर्ड बॉय बळीराम खरात ह्यांनी वॉर्डात जाऊन बघितले असता त्यांना आग लागल्याचे व खूप धूर असल्याचे दिसून आले त्या नंतर त्यांनी लगेच फायर सिलेंडर घेऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयन्त केले त्या मध्ये त्यांनी ६ सिलेंडर वापरले परंतु आग विझे पर्यंत वॉर्डात ऍडमिट असलेले पैठण येथील हरिभाऊ बापूजी लोकडे अंदाजे वय ६५ वर्ष यांचा जळून मृत्यू झाला होता या आगीचे कारण अद्यापही समजले नाही या घटनेची माहिती केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांना मिळताच त्यांनी या बाबत गंभीर दखल घेऊन या सर्व प्रकरणाच्या साठी एक समिती नेमून योग्य ती चोकशी करून जे कोणी या घटनेसाठी जबाबदार असतील अश्या दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती या वेळी केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांचे स्वीसहायक राजु भोर यांनी बोलतांना दिली
लवकरच समिती नेमून खऱ्या दोषींवर होणार कडक कार्यवाही
केंद्रीय आयुष्य व आरोग्य मंत्रालयातून तात्काळ घेण्यात आली घटनेची दखल