राजकीय
वन बुलडाणा मिशनचे संदीप शेकळे आज ३ एप्रिल रोजी भरणार उमेदवारी अर्ज
बुलडाणा : वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. उद्या ३ एप्रिल रोजी संदीप शेळके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते सकाळी ११.०० वा. जिजामाता प्रेक्षागार जवळील नाट्य क्रिडा मंडळाच्या खुल्या मैदानावर आयोजित सभेला संबोधित करणार आहेत तर दु. १२. ३० वा. ते १:३० दरम्यान बुलडाणा शहरातील मुख्य चौकातुन प्रचार रॅली करणार आहे. त्यानंतर दुपारी २ वा. संदीप शेळके नामांकन अर्ज दाखल करणार आहेत.