वन बुलढाणा मिशनचा आज शेगावात महिला मेळावा संदीप शेळके साधणार हजारो महिलांशी संवाद

बुलढाणा : वन बुलढाणा मिशनच्यावतीने ७ जानेवारी रोजी संतनगरी शेगाव येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशनजवळील वर्धमान जैन भवनात दुपारी १ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके हजारो महिलांशी संवाद साधणार आहेत.
महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत यासाठी संदीप शेळके यांनी राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून बचतगटांच्या ३५ हजार महिलांना १५० कोटींचे आर्थिक सहाय्य केले आहे. याद्वारे अनेक महिलांनी स्वतः चे व्यवसाय उभारले आहेत. आज ह्या महिला जिल्ह्याच्या विकासात योगदान देत आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ कार्यरत आहे. औद्योगिकरण म्हणजे विकास नव्हे. तर सर्वच घटकांचा विकास झाला पाहिजे.
शेगाव येथील मेळाव्यात संदिप शेळके महिलांच्या समस्या जाणून घेणार आहेत. तसेच उद्योगविषयक मार्गदर्शन करणार आहेत. महिलांना अनेक योजनांची माहिती देण्यात येणार आहे. मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.