Blog

वरवट बकाल कला वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] वरवट बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम येरणकर तर आयक्युऐसी समन्वयक प्रा.डॉ. संजय टाले, कला विभाग प्रमुख डॉ. सुभाष पवार, विज्ञान विभाग प्रमुख
प्राध्यापक संतोष म्हसाळ, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. सतिश राणे, एनसीसीचे मुख्य अधिकारी व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ निशिगंध सातव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुरेश भालतडक या मान्यवरांची प्रमुख उपस्थित होती शिक्षक दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांनी आपल्या शालेय जीवनातील विविध शिक्षकांचे अनुभव व अमूल्य शिकवण याबद्दल सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. येरणकर यांनी विद्यार्थ्यांना वेळेचा सदुपयोग तसेच नवीन ज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध उपक्रम याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन कु. ऋतुजा डहाके, प्रास्ताविक कु प्रांजल हागे तर आभार प्रदर्शन कु. श्रावणी सरोदे हिने केले. याप्रसंगी कु.प्रिया अवचार हिने आपल्या सुरेल आवाजामध्ये स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाला महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. माधुरी हिंगणकर, सह-कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक निलेश शेळके तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या पथकाने प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak