विशेष बातमी

वरवट बकाल नवयुवक गणेश मंडळच्या वतीने विविध स्पर्धा , किर्तन , वृक्षरोपन , रक्तदान शिबीराचे आयोजन

 

संग्रामपुर [ प्रतिनिधी] तालुक्यातील वरवट बकाल येथील नवयुवक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या २३ वर्षा पासुन विविध स्पर्धा सांस्कृत कार्यक्रम रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते त्याचाच एक भाग म्हणुन श्री गणेश आगमण सोहळा ते श्री गणेश विसर्जन सोळ्या दरम्यान धार्मिक कार्यक्रमा अंतर्गत किर्तन, समाज प्रबोधन , शेतकरी यांना मार्गदर्शन तसेच युवकांना स्पर्धा परिक्षा संदर्भात मार्गदर्शन , महिला भजन मंडळीचे किर्तन विविध स्पर्धा , वृक्षरोपन ,रक्तदान शिबीर १० दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यात दि ७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता श्री गणेश आगमण सोहळा दि ८ सप्टेंबर रोजी सकाळी वृक्षरोपन रात्री संगीत खुर्ची , दि ९ सप्टेंबर डान्स स्पर्धा , गीत गायन स्पर्धा, दि १० सप्टेंबर रात्री ८ वाजता मॅजिक शो , डान्स स्पर्धा , दि ११ सप्टेंबर बुधवार रोजी इटिंग स्पर्धा महिलांसाठी पाक कला , दि १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता ह भ प पुनमताई बावस्कार यांचे किर्तन , १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता शेतकरी मार्गदर्शन व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन दि १४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता नवदुर्गा महिला मंडळ वरवट बकाल यांचे भजन , दि १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भव्य रक्तदान शिबीर , दि १६ सप्टेंबर रोजी भव्य महाप्रसाद दि १७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन सोहळा श्री गणेश उत्सव स्पर्धा दरम्यान दैनदिन श्री गणेश आरती सकाळी ८ व रात्री ८ वाजता होणार आहे विविध कार्यक्रमा प्रसंगी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हाण नवयुवक गणेश मंडळच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak