घटना
वरवट बकाल येथील कर्जा पाई युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथील40 वर्षीय युवा शेतकऱ्याने कर्जा पायी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनाक 31मे च्या रात्री घटना घडली मृतक शेतकरीचे नाव देविदास महादेव वानेरे आहे याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि देविदास वानेरे यांच्या नावाने ३ एकर शेती असुन सततची नापिकी त्यात जिल्हा केंन्द्रीय बॅके पिक कर्ज खाजगी फायनसचे कर्ज कर्जाचे वाढते डोंगर कर्ज बाजारी पणाला कंटाळुन शेतकरी देविदास महादेव वानेरे हे बऱ्याच दिवसा पासून व्यथित होते शेवटी31मे रात्री त्यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपविले घटनेची माहिती कळताच तामगाव पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून वरवट बकाल ग्रामीण रुग्णलयामध्ये 1जून प्रेताचे शवविच्छेदन झाल्या नंतर मृतक शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृतक देवीदास वानेरे यांच्या पश्चात आई पत्नी भाऊ 2मुली एक मुलगा आप्त परिवार आहे