महाराष्ट्रराजकीय

वरवट बकाल येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडी कडून निषेध आंदोलन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील वरवट बकाल येथे मालवण येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या झालेल्या अवमान प्रकरणी महाविकास आघाडी कडून निषेध आंदोलन करण्यात आले केंद्र व राज्य शासनाचा निषेध आला महाराष्ट्राची अस्मिता असलेले चक्रवर्ती राजे शिवाजी महाराज यांचा मालवण येथील पुतळा कोसळला
आठ महिन्यापूर्वी बसविलेला हा पुतळा एवढ्या लवकर कसा काय कोसळू शकतो.? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.भाजप प्रणित युतीचे सरकार महाराष्ट्रातील थोर, महापुरुष, महाराष्ट्रीयन संत यांचा वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारे अपमान करीत असलेल्या घटना घडत आहे.
करोडो रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम कसे झाल याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मांगणी यावेळी महाविकास आघाडी नेते पदाधिकाऱ्यांनी केली
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा कोसळला. त्याचा निषेध नोंदवत महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आले
छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या
तसेच भाजप आमदार नितेश राणे याने बेताल वक्तव्य केल्याबाबत त्याचाही या प्रसंगी निषेध करण्यात आला यावेळी काँग्रेसच्या स्वातीताई वाकेकर, राम विजय बुरुंगले,राष्ट्रवादीचे प्रसेन्नजित पाटील, भाऊ भोजने ,सेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार,  काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, कॉग्रेस जळगाव जा तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय मारोडे  , नारायण ढगे  , शिवसेना ठाकरे वाहतुक सेना जि उपाध्यक्ष प्रल्हाद अस्वार ,श्याम डाबरे,आसिफ इकबाल समाधान दामोदर, प्रा मोहन रौंदळे, प्रवीण भोपळे,दादा पाटील,जहीर ठेकेदार, स्वप्निल देशमुख,धर्मेंद्र इंगळे, जगन्नाथ विश्वकर्मा,गजानन ढगे, अमीत भोंगळ ,प्रमोद कडे, बळीराम धुळे, राजु राठोड, दत्ता बोरोकार,मनोहर राऊत, शेख सद्दाम, पंकज तायडे, पप्पू पठाण,शिवसेना माजी तालुका प्रमुख जगन्नाथ मिसाळ, उपतालुका प्रमुख विजय मारोडे,  युवा सेना उप जिल्हा प्रमुख पंकज मिसाळ, अजय घिवें, युवासेना तालुका प्रमुख प्रशांत इंगळे, भगवान पवार, धनंजय अवचार,गोपाळ झाडोकार  महाविकास आघाडी पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: welcome to vidarbhadastak