वरवट बकाल येथे नवविवाहित युवा उद्योजक संदिप तेटू यांचा सर्पदंशाने मुत्यू
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] संग्रामपुर रसत्यावर निरोलॅक ऑईल पेंन्टसचे संचालक संदीप शेषराव तेटू रा.सुनगांव ह.मु.वरवट बकाल या युवकाला स्वताच्या दुकानात ग्राहकाला ऑईल पेंन्टस देतांना सर्पदश झाल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर सई बाई मोटे रुग्णालयात हलविले उपचार दरम्यान मुत्यू झाल्याची घटना दि २१ मे रोजी घडली जळगाव जा तालुक्यातील सुनगाव येथील रहिवासी व्यवसाय निमित्त वरवट बकाल येथे स्थाईक झालेले युवा उद्योजक नवविवाहित संदिप तेटू निरोलॅक आईल पेंन्टस कंपनीचे विक्रेते होते संग्रामपूर मेन रोडवरील निरोलॅक ऑइल पेंट्स कंपनीचे दुकान आहे दि २१ मे रोजी दुपारच्या दरम्यान ग्राहकाला सामान देताना सर्पदंश झाला वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले मात्र अस्वस्थ वाटत असल्याने सईमोटे उपजिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान मुत्यू झाला १५ दिवसापुर्वी युवा व्यापारी संदिप तेटू यांचा विवाह झाला होता संर्प दंशामुळे नवविवाहित युवा उद्योजकाचा दुदैवी मुत्यू झाल्याने सुनगाव व वरवट बकाल परिसरातील व्यापारी वर्गामध्ये हळ् हळ् व्यक्त होत आहे