वान नदि पात्रात २३ वर्षीय युवकाचा बुडून मुत्यू काकनवाडा शिवारातील घटना मृतक तेल्हारा तालुक्यातील कोठा गावाचा
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील काकणवाडा शिवारातील वाननदि पात्रात आंघोळ साठी गेलेल्या २३ वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना दि २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ :३० उघडकीस आली मृतक युवकाचे नाव शिवम राजेश अहेरकर आहे या बाबत थोडक्यात हकिकत असे प्रकारे आहे कि तेल्हारा तालुक्यातील कोठा येथील शिवम अहेरकर हा मित्रा सह फिरायला आला होता काकनवाडा पुला पासुन काही अंतरावर वाननदि पात्रात डोहात आंघोळ करण्यासाठी उतरला डोह खोल असल्याने त्यात शिवम बुडाला त्याला त्याच्या मित्रांनी बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय वरवट बकाल येथे हलविले असता वैधकिय अधिकारी यांनी तपासणी करुन मृत घोषीत केले
तामगाव पोलीसांनी कलम १९४ बी. एन. एस.एस
मर्ग दाखल केला असुन तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास प्रमोद मुळे, बीट जमादार सुनिल वावगे, करित आहे