महाराष्ट्रविशेष बातमी
वाहन चालका विरुध्द घेतलेला अन्याय कारक शासन निर्णय रद्द करा संग्रामपुर तालुका एकता वाहन चालक मालक संघटनेची मुख्यमंत्रीकडे मागणी

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] वाहनाचा अपघात झाल्यास त्या अपघात ग्रस्ताला सोडून गेल्यास वाहन चालकाला १० वर्षाचा कारावास व दंड शासनाने निर्णय वाहन चालक मालका साठी अन्याय कारक असुन वाहन चालका विरुद्ध शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी तालुक्यातील एकता वाहन चालक मालकांनी मालवाहक व प्रवाशी वाहने बंद ठेवुन शासना विरुद्ध रोष व्यक्त करित तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्या कडे एकता वाहन चालक व मालक संघटनेने केली आहे मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदना नमुद केले आहे की वाहन चालताना अपघात झाल्या नंतर वाहन चालक त्या अपघातग्रस्त व्यक्तीला घटनास्थळी सोडून गेल्यास १० वर्षाची कारावास देण्याचा आदेश दिला आहे हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याने वाहन चालक हे कदापिही अपघात घडेल असे कृत्य व जाणून बुजून विनाकारण करत नाहीत अपघात हे नजर चुकीने होतात, व अपघात झाल्यास चालकाला अपघात ग्रस्ताला मदत करण्याचे सहकार्य करतातच. मात्र घटनास्थळी असलेले जमाव हे त्या वाहन चालकाला चौकशी न करता त्याला दोषी ठरवतात वाहन चालकाला मारहाण व वाहनाचे नुकसान करतात, त्यामुळे घटना स्थळा वरुन स्वताच्या सुरक्षेच्या दुष्टीकोनातुन वाहन चालक निघुन जातात. मात्र शासनाने घेतातलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असल्याने सदर निर्णय रद्द करण्यात यावा १ जानेवारी पासुन संग्रामपूर तालुक्यातील माल वाहक व प्रवाशी वाहन रसत्यावर दिसणार नाही सदर निर्णय हा तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा या पुढेही लोकशाही मार्गाने रस्तावर उतरून आंदोलन करण्यात येणार असा ईशारा उदध्व बा ठाकरे शिवसेना वाहतुक सेना जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अस्वार, सैय्यद शफाकत अली अमोल बकाल,गणेश ईगळे, शेख मतीन ,रामदास उमाळे , एकनाथ ढगे,लखन ढगे,रवी सोळंके, शाहरूख अली ,शेख आसिफ,शेख अश्फाक,छोटू ईगळे,चक्रधर ईगळे, शेख इब्राहीम कुरेशी, दावल कुरेशी,अजमद खान,सलाम कुरेशी,अरुण तायडे, शेख महोमंद कुरेशी ,शेख कालु , मुज़म्मील खान, शेख समीर , शेख शाकीर , शेख नादु कुरेशी , एकता चालक मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी खाजगी मालवाहक व प्रवाशी वाहन चालक मालक व एकता चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
बॉक्स
प्रवाशी वाहन चालकांचा बेमुद्दत बंद चा ईशारा
तालुक्यातील एकता मालक चालक संघटनेच्या वतीने वाहन चालका विरुद्ध शासनाने घेतलेला निर्णया विरुद्ध रोष व्यक्त करित प्रवाशी वाहन बंद होती त्यामुळे प्रवाशीची गैरसोईचा सामना करावा लागला तर १ जानेवारी पासुन बेमुद्दत बंदच्या ईशाऱ्यामुळे प्रवाशीना गैरसोईचा सामना करावा लागणार भारतात ठिकठिकाणी खाजगी वाहन चालकाच्या प्रवाशी व मालवाहक वाहने बंद असल्याने शासन निर्णय रद्द करावा प्रवाशी व मालवाहक वाहनेपुर्वरत सुरळीत सुरु करण्याची मांगणी नागरिकां कडून होत आहे