विशेष बातमी

विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबीत मांगण्यासाठी तहसिल समोर एक दिवशीय धरणे आंदोलन

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबीत मांगण्यासाठी तहसिल समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले तलाठी मंडळ अधिकारी यांनी काळ्या फिती लावुन काम केले २५ जुलै रोजी धरणे आंदोलन दरम्यान शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हास्तरावर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्याची तर २६ जुलै रोजी तलाठी व मंडळ अधिकारी डिएससी तहसिल कार्यालयात जमा करतील , २९ जुलै रोजी सर्व तलाठी मंडळ अधिकारी सामुहिक रजा आंदोलनाची घोषणा विदर्भ तलाठी व मंडळ अधिकारी संघचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद भिसे शाखा संग्रामपुर च्या वतीने करण्यात आली
विभागीय आयुक्त यांचे कडे मान्यतेसाठी प्रस्तावित तलाठी संवर्गाच्या बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा. प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या. नियतकालिक बदलीस पात्र तलाठी यांचे समुपदेशनाद्वारे बदली करण्यात यावी. बदलीस इच्छुक तलाठी यांची विनंती व आपसी बदली करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून पूर्वी प्रमाणे उपविभाग स्तरावर आस्थापना ठेवण्यात येऊन उपविभागांतर्गत बदली प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.सर्व तलाठी व मंडळअधिकारी यांना नविन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावे.सन २०१९ पासून प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे तत्काळ अदा करण्यात यावे.प्रलंबित नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाचा प्रशासकीय खर्च २५% लवकरात लवकर अदा करावा.
डेटा कार्डचे इंटरनेट वापराचे अतिरिक्त साझा चे शुल्का लवकरात लवकर अदा करण्यात यावे.ई चावडी ऑनलाईन वसुली साठी व इतर सबंधित कामकाजासाठी सक्ती व दबावतंत्राचा वापर न करणे बाबत ,लोकसभा निवडणूक मानधन, कृषिगणना मानधन व मराठा आरक्षण सर्व्हेक्षण मानधन तात्काळ अदा करण्यात यावे ,नायब तहसीलदार पदासाठी तलाठी मंडळ अधिकारी यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी.
पदोन्नती प्रक्रीये बाबत वेळेवर पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. या मांगण्यासाठी विदर्भ पटवारी मंडळ अधिकारी संघ नागपुर शाखा संग्रामपुरच्या वतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भ पटवारी व मंडळअधिकारी संघ नागपुर शाखा संग्रामपुरचे पदाधिकारी तलाठी मंडळ अधिकारी सहभागी झाले होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak