विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबीत मांगण्यासाठी चौथ्या टप्पाचे आंदोलन तहसिलदार यांना समस्त तलाठी यांनी डिएससी जमा केल्या
संग्रामपुर [ प्रतिनिधी ] विदर्भ पटवारी व मंडळ अधिकारी यांच्या विविध प्रलंबीत मांगण्यासाठी तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लाऊन काम केले तर २५ जुलै रोजी तहसिल समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले २५ जुलै रोजी तर २६ जुलै रोजी तलाठी व मंडळ अधिकारी डिएससी तहसिल कार्यालयात जमा करतील त्याप्रमाणे आंदोलनाचा चौथा टप्प्यात तहसिलदार योगेश्वर टोंम्पे यांच्या कडे डिएससी जमा करण्यात आले २९ जुलै रोजी सर्व तलाठी मंडळ अधिकारी सामुहिक रजा आंदोलनाची घोषणा प्रमाणे विदर्भ पटवारी संघ शाखा संग्रामपुरचे तलाठी व मंडळ अधिकारी संघचे तलाठी मंडळ अधिकारी सामुहिक रजा आंदोलना सहभागी होणार आहेत
विभागीय आयुक्त यांचे कडे मान्यतेसाठी प्रस्तावित तलाठी संवर्गाच्या बदलीचा अन्यायकारक प्रस्ताव मागे घेण्यात यावा. प्रस्तावित बदल्या रद्द करण्यात याव्या. नियतकालिक बदलीस पात्र तलाठी यांचे समुपदेशनाद्वारे बदली करण्यात यावी. बदलीस इच्छुक तलाठी यांची विनंती व आपसी बदली करण्यात यावी. जिल्हा स्तरावरील तलाठी आस्थापना रद्द करून पूर्वी प्रमाणे उपविभाग स्तरावर आस्थापना ठेवण्यात येऊन उपविभागांतर्गत बदली प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.सर्व तलाठी व मंडळअधिकारी यांना नविन लॅपटॉप व प्रिंटर विनाविलंब देण्यात यावे.सन २०१९ पासून प्रलंबित तलाठी कार्यालय भाडे तत्काळ अदा करण्यात यावे.प्रलंबित नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपाचा प्रशासकीय खर्च २५% लवकरात लवकर अदा करावा.
डेटा कार्डचे इंटरनेट वापराचे अतिरिक्त साझा चे शुल्का लवकरात लवकर अदा करण्यात यावे.ई चावडी ऑनलाईन वसुली साठी व इतर सबंधित कामकाजासाठी सक्ती व दबावतंत्राचा वापर न करणे बाबत ,लोकसभा निवडणूक मानधन, कृषिगणना मानधन व मराठा आरक्षण सर्व्हेक्षण मानधन तात्काळ अदा करण्यात यावे ,नायब तहसीलदार पदासाठी तलाठी मंडळ अधिकारी यांना खात्यांतर्गत विभागीय परीक्षा लागू करावी.
पदोन्नती प्रक्रीये बाबत वेळेवर पूर्ण होण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा. या मांगण्यासाठी काळ्या फिती लाऊन कामकाज दुसऱ्या टप्पा एकदिवशीय धरणे , तिसऱ्या टप्पयात जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवशीय धरणे , चौथा टप्पा सर्व तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी संग्रामपुर तहसिलदार यांना निवेदन देऊन डिएससी जमा केले यावेळी विदर्भ पटवारी व मंडळअधिकारी संघ नागपुर शाखाओं संग्रामपुरचे पदाधिकारी तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते