विशेष बातमी

विद्यार्थ्यांनीं भयभीत न होता पोलीस बांधवांशी संपर्क साधुन आपला प्रवास सुरक्षित करावा ठाणेदार राजेंद्र पवार

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] जिल्ह्यात नुकत्याच विद्यार्थी अपहरणाच्या घटना पाहता विद्यार्थ्यानी मनात कोणतेहे भय न ठेवता रसत्याने दुचाकी चार चाकी वाहनांना हात देऊ नये व या वाहनाने प्रवास करु नये स्कुल बस, एस टी बसने सुखरूप प्रवास करावा प्रवास दरम्यान सर्तक दक्ष राहूनच प्रवास करावा प्रवास करतांना अडचण संश्य आल्यास संबंधीत शाळा स्कुलचे शिक्षक परिवारातील सदस्य पोलीस बांधव यांचे मोबाईल नंबर सोबत ठेवावे जेणे करुन अपहरणा च्या घटनांना आळा बसेल विद्यार्थ्यांनीं भयभीत न होता आपला प्रवास सुरक्षित करावा असे प्रतिपादन तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार राजेंद्र पवार यांनी वरवट बकाल येथील सातपुडा इंग्लिश मेडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांना सुचना मार्गदर्शन करतांना केले तामगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले कि जिल्ह्यात नुकताच झालेल्या विद्यार्थी अपहरण च्या घटना व त्यातून विद्यार्थी यांनी आपली फसवणूक कश्या प्रकारे होते आपण स्वता कशे सुरक्षित राहू व आपण कोणती दक्षता घ्यावी. याबाबत विस्तृत असे मार्गदर्शन त्यांनी उपस्थित विद्यार्थीना य केले
विद्यार्थी यांनीं रोड वरून जात असताना आपण श्यकतो मोठ्या प्रमाणात स्कूल बस च्या, एस टी बस च्या माध्यमातून आपला प्रवास सुखरूप करावा. आपण सर्वांनी आपल्या जवळ पोलीस बांधव सह आपल्या स्कूल मधील शिक्षक बांधव व परिवार मधील व्यक्तीचे नंबर सोबतच ठेवावे व केव्हाही याबाबत आपणास अडी अडचणीच्या वेळेस प्राधान्याने पोलीस बांधवाशी संपर्क साधल्यास आपणास तामगाव पोस्टे कडून विना विलंब आम्ही आपल्याला सुरक्षतता पुरविण्याचे आश्वासन ठाणेदार पवार यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले रोडवरून जाणाऱ्या वाहन यांना कधीच हात देऊ नये. आपल्या स्कूल च्या वेळेचे बंधन सर्वांनी पाळावे वेळेत आपला प्रवास सुखरूप करावा. सोबतच त्यांनी सोशल मीडिया बाबत मार्गदर्शन करित विद्यार्थ्यांनीं भयभीत न होता आपला प्रवास सुरक्षित करावा असे आव्हानही शेवटी ठाणेदार राजेंद्र पवार यांनी केले
यावेळी कार्यक्रमाचे संचालन पंकज तायडे यांनी केले. कार्यक्रमाला गोपनीय पोलीस अंमलदार मनीष वानखेडे सह सातपुडा स्कूल चे प्राचार्य नायक उपप्राचार्य पंकज आमले, महेश सातव, मिलिंद वानखडे, रुपेश टाकळकर, धम्मपाल दाभाडे,गोपाल उभे यांच्या सह शिक्षक व शिक्षिका व कर्मचारी वृंद उपस्थित होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: welcome to vidarbhadastak