घटना
विद्युत वितरण सेवानिवृत कर्मचारी गजानन काळे यांचा ब्रेन हॅमरेजमुळे मुत्यू
संग्रामपुर [प्रतिनिधी ] तालुक्यातील पातुर्डा येथील रहिवासी ह मु वरवट बकाल विद्युत वितरण कंपनीचे सेवा निवृत्त कर्मचारी गजानन रामचंद्र काळे यांचा ब्रेन हॅमरेजमुळे अकोला येथील खाजगी रूग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले मुत्यू समयी त्यांचे वय ६६ वर्ष होते आज दि ९ मे रोजी सकाळी आंघोळ केल्यानंतर अचानक भुरळ येऊन जमीनवर कोसळले तात्काळ त्यांना शेगाव येथे उपचारासाठी हलविले मात्र सुविधा अभावी वैधकिय अधिकारी यांच्या सलल्या नुसार अकोला खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार दरम्यान मुत्यू झाला त्यांच्या पश्चात पत्नी , २ मुले , १ मुलगी, २ भाऊ , सुना बराच आप्त परिवार आहे
*गजानन भाऊ काळे यांना विदर्भ दस्तक परिवारा कडून भावपुर्ण श्रद्धांजली*💐💐💐*