विशेष बातमी
विशालगड व गाजापुर मुसलीम वस्ती व धार्मिक स्थळावर हल्ला करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] कोल्हापुर विशालगडा व गाजापुर येथील अतिक्रमरण काढण्याच्या नावावर समाजकंठकांनी छ संभाजीराजे यांच्या आव्हाना नुसार व नेतृत्वात शासकिय परवानगी नसतांना अनअधिकृत मोर्चा काढण्यात आला पोलीस प्रशासनाने मज्जाव केला असता यादरम्यान विशालगडावरील व गाजापुर येथील अतिक्रमणाचा कोणताही संबंध नसतांना समाजकंठकांनी मुसलीम वस्ती व धार्मिक स्थळ मस्जीद हल्ला करुन मस्जीदची तोडफोड करून पवित्र कुराणची अहवेलना केली मस्जिद मधील धार्मिक पुस्तकाची जाळपोळ तसेच घर व दुकानातील साहित्याची नासधुस करुन दगळ फेक केल्याने नागरिक व पोलीस जखमी केले दोन समाजात तेढ निर्माण करून सामाजीक बांधलकी बिघडविणाऱ्या समाजकंठकावर कठोर कारवाई करण्याची मांगणी मुसलीम सेवा संघाचे अब्दुल हमीद यांच्या नेतृत्वात संग्रामपुर येथील मुसलीम समाज बांधवांनी तामगाव पोस्टेचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे
मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि गाजापुर गावाचा विशालगडावरिल अतिक्रमणचा दुरपर्यत संबंध नसतांना विना परवानगी मोर्चा काढण्यापुर्वी गाजापुर येथील मुसलीम समाज बांधवांनी प्रशासनाला निवेदन देऊन मोर्चा दरम्यान मुसलीम वस्ती व धार्मिक स्थळावर हल्ला होऊ शकतो सुरक्षा पुरविण्यात यावी तरिही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने मोर्चा दरम्यान गाजापुर येथील मुसलीम वस्ती व धार्मिक स्थळावर समाजकंठकांनी लाठ्या काठ्या शस्त्र हातात घेऊन हल्ला करुन धार्मिक स्थळात घुसुन तोडफोड केली धार्मिक ग्रंथ ,पुस्तकाची जाळपोळ केली लहान अबालवृध्द ,पुरुष महिलाना मारहान केली माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानवीय कृत्य करणाऱ्या संबंधीत हल्लेखोर संमाज कंठकांची चौकशी करुन छ संभाजीराजे व हल्लेखोर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी मुसलीम समाजाला न्याय द्यावा अशी मांगणी मुख्यमंत्री यांच्या कडे मुसलीम सेवा संघाचे अब्दुल हमीद, वसिम खान, शेख ईसराइल , शेख साबीर ,सिद्दीक कुरेशी , शेख कारिस , मो तौफीक जमादार , शेख अनिस , शेख नईम , अ खालीक , सैय्यद मुज़म्मील , शेख रयाज कुरेशी , शेख सलीम , अनिस खान , गफुर शाह , सह सकल मुसलीम समाज बांधवांनी केली आहे