राजकीय
शिव अल्पसंख्याक सेनेचे जिल्हाप्रमुख सैय्यद इकबाल यांचेसह धाड येथील शेकडो युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाहीर प्रवेश
बुलडाणा :- प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले निष्ठावान कट्टर शिवसैनिक शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख सैय्यद इकबाल यांचेसह धाड येथील शेकडो युवकांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या विचारधारेचे आदर्श घेऊन (शरद पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केले असून सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम हे जिल्हा अध्यक्षा सौ.रेखाताई खेडेकर यांच्या मार्गदर्शनात,जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके व तालुकाध्यक्ष तुळशीराम दादा काळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.रिजवान खान व शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.