शेख मतीन शेख नजीर यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड
शेख मतीन शेख नजीर यांच्या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड
बुलढाणा :- शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या सर फाऊंडेशन महाराष्ट्रने आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२३’ चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. संपूर्ण राज्यभरातून तसेच इतर राज्यातून ही या स्पर्धेसाठी नवोपक्रम सादर करण्यात आले होते.
शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे काळानुसार गरजेचे आहे. हेच नवोपक्रम इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरतात. राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेत अनेक उपक्रमशील शिक्षकांनी भाग घेतलेला होता यात बुलढाणा जिल्ह्यातून शेख मतीन शेख नजीर जि. प. उर्दू उच्च प्राथमिक शाळा मुले देऊळघाट पंचायत समिती बुलढाणा यांचा ‘ॲक्शन वर्ड्स प्रॅक्टिसेस ऍट प्रायमरी स्कूल लेवल’ (शाळा स्तरावरील क्रिया शब्दांचा सराव ) या उपक्रमाची अंतिम निवड करण्यात आली आहे. त्यांना मे 2024 मध्ये राष्ट्रीयस्तर समारंभात ‘नॅशनल इनोव्हेटिव्ह अवार्ड्स’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर फाऊंडेशन चे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, महिला समन्वयक हेमा वाघ, आयटी विभाग प्रमूख राजकिरण चव्हाण , शिक्षण क्षेत्रातील अधिकारी, मान्यवर व शिक्षक बंधू भगिनींनी व परिवार, नातेवाईक व मित्रांनी कौतूक केले.