विशेष बातमी

शेगाव पातुर्डा एस टी बसच्या वाहक पवार याची प्रवाश्याना उद्धट अपमानास्पद वागणुक आगार प्रमुख जवंजाळ चौकशी करुन कारवाई करणार का ?

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] शेगाव आगाराच्या पातुर्डा गावासाठी एस टी बसेस वेळेवर येत नसल्याने प्रवाशीना एस टी प्रतिक्षा करित प्रवाश्याची गर्दी वाढते बसेसच्या फेऱ्या नादुरुस्त तांत्रीक अडचण एस टी बस रद्द करण्यात येतात त्यामुळे प्रवाशी मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात एम एच १४ बीटी २८९४ क्रमांकाची शेगाव पातुर्डा साडेबारा वाजताची एस टी बस पातुर्डा येथुन शेगाव साठी प्रवाशी एस टी बस मध्ये बसतांना प्रवाशी यांच्याशी एका प्रवाशीने वाहक एम एच पवार यांना खाली असलेल्या प्रवाशीना आत घेण्यासाठी उभे प्रवाशीना मांगे घेण्याचे सांगितले असता संबंधीत वाहक याने ते माझे काम नाही कारण नसतांना प्रवाशीना तुमच्या बापाची गाडी समजता का मी कोणालेच काई समजत नाही माझी कुठेही तक्रार करा माझे कोणी वाकळे करु शकत नाही एका वृध्द महिले सोबत शाळकरी मुली साठी शेगाव येथील एका खाजगी शाळे जवळ थांबविण्याची विनंती करुनही त्याकडे दुर्लक्ष केले बस स्थानकावरच थांबविले प्रवाशीना उद्धट वागणुक अपमानास्पद वागणुक देत वरुन प्रवाश्यांना दमदाटी करित चालकाला पोलीस स्टेशन घेऊन चला पोलीस कारवाई करण्याची प्रवाशीना धमकी दिल्या प्रकार आज शेगाव पातुर्डा प्रवास दरम्यान घडला शेगाव आगारात कार्यरत वाहक एम एच पवार याची आगार प्रमुख जवंजाळ सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करुन प्रवाशी वर्गाना उध्दट वागणुक देत कर्मचारी असल्याचा भान न ठेवता दादागिरीची भाषा वापरणाऱ्या संबंधीत वाहक पवार वर कारवाईची मांगणी प्रवाशी वर्गातुन जोर धरत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *