विशेष बातमी
संग्रामपुरात महेश नवमी निमित्त गुणवंताचा सन्मान ,रक्तदान, वृक्षरोपन विविध कार्यक्रम संपन्न



सर्व प्रथम भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आला माहेश्वरी समाज संग्रामपुर तालुक्याच्या वतीने सामाजीक कार्यकर्ते व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत त्यानंतर गुणवंत विद्यार्थीचा माहेश्वरी समाज मंडळ तालुक्याच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला तसेच सामुहिक कुंटुंबाचा सत्कार करण्यात आला २१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान केले डॉ हेगडेवार ब्लड बॅकचे रमेश देशपांडे, डॉ समी देशमुख, युवराज खोडके, अविनाश पोहरे , संदिप नरकाडे ,डॉ कविता इंगळे , अंजली वैद्य , यांनी रक्तदात्यांचे रक्त संकलन केले याप्रसंगी माहेश्वरी समाज मंडळ जिल्हाध्यक्ष संजय सातल , दिनेश गांधी, विवेक मोहता , कमलजी माहेश्वरी , प्रकाश राठी, सुभाष मंत्री व तालुक्यातील माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठीत नागरिक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपन करुन वृक्षसंर्वधन करण्याचे आव्हान माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी संग्रामपुर, सोनाळा , वरवट बकाल , टुनकी , पळशी झाशी , चांगेफळ , वकाना, आकोली, बोडखा , निवाणा , तालुक्यातील माहेश्वरी राजेस्तानी समाज बांधवांनी परिश्रम घेतले