संग्रामपुर तहसिल कार्यालयात तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांनी पदभार घेताच केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] येथील तहसिल कार्यालयात तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांची बदली झाली होती बदली रद्द होऊन पुन्हा संग्रामपुर तहसिलदार पदी नियुक्ती झाली तहसिलदार पदाचा पदभार घेताच तहसिलदार टोम्पे यांनी महसुल अधिकारी व कर्मचार्या सह छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सहात साजरी केली
तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांची प्रशासकीय बदली झाली होती शेतकरी व सर्व सामान्याचे कामे करुन शेवटच्या घटकाच्या गळ्यातील तावीत बनलेले कर्तव्यदक्ष तहसिलदार टोम्पे यांची बदली रद्दची मांगणी जोर धरत होती साठी सर्व सामान्य नागरिक आतुरतेने वाट पाहत होते अखेर तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांची बदली रद्द झाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तहसिलदार पदाचा टोम्पे यांनी पदभार स्विकारला व तहसिल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी केली यावेळी तहसिलदार टोम्पे , तालुका कृषि अधिकारी , नायब तहसिलदार हरिभाऊ उकर्डे , पट्टेडिवार यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर प्रकाश टाकला संचालन डॉ सरोदे यांनी केले तर लिपीक जाधव यांनी आभार मानले कार्यक्रमाला आर सी वन किशोर गवई , भास्कर , सह महसुल कर्मचारी उपस्थित होते