महाराष्ट्रविशेष बातमी
संग्रामपुर तालुक्यातील ऐतिहासिक भोन स्तुप वाचवीण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चात जनसमुदाय मोठया संख्येने उपस्थित राहणार

संग्रामपुर [ प्रतिनिधी ] तालुक्यातील भोन स्तुप वाचवा अशी मांगणी बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली तालुक्यातील भोन स्तुप वाचविण्यासाठी बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने १७ मार्च रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा धडकणार आहे याबाबत जिल्हाधिकारी यांन निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदन नमुद आहे कि दि. ०९ फेब्रुवारी २०२४ रोजी भोन स्तुप संवर्धन व ऊत्खनाबाबत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना कळविले असता अध्यापही कोनतेच लेखी ऊत्तर प्राप्त झाले नाही. तसेच सम्राट अशोक काळात ८४ हजार बौध्द स्तुपांपैकी एक अतिषय महत्वाचा स्तुप संग्रामपुर तालुक्यातील भोन येथे सापडला असून ह्या संदर्भात २००६ मध्ये डेक्कन कॉलेजचे डॉ. देवतारे यांनी संशोधन करून तो जगासमोर आनला. यासंदर्भात सरकार कडे बुध्दिष्ट इंटरनॅशनल संघटनेकडून पाठपुरावा करने सुरू आहे. तसेच २०१९ मध्ये शेगांव येथे राज्यस्तरीय भोन स्तुप वाचवा महामेळावा घेण्यात आला असता तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारने ५०९ कोटी रूपये निधी भोन स्तुप संवर्धन उत्खनन करण्यासाठी घोषीत केला होता तो अद्यापही खर्च झाला नाही ऊलट जिगाव प्रकल्प धरनाचे काम झपाट्याने होत आहे.त्यामुळे भोन स्तुप नष्ट होवू शकतो हा संशय आहे कारण येना-या पावसाळ्यात जर पाण्याने मुसुंडी मारली तर या ठिकाणी पाणि हे स्तुपात शिरन्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे शासकीय प्रशासना यंत्रना दुर्लक्ष करित आहे. हा स्तुप गेल्या २००२ पासून जगासमोर आला तब्बल २२ वर्षे पासुन भोन स्तुपचे उत्खनन, संवर्धन संरक्षणाचे काम मार्गी लागले नाही सरकार याकडे जानीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बुध्दिष्ट समाज बांधवातुन नाराजीचा सुर निघत असुन शासन प्रशासना विरुध्द रोष व्यक्त होत आहे या घटनेचा तिव्र निषेध करीत बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या वतीने १७ मार्च रोजी घटनेचा निषेध व सरकारचे भोन स्तुप वाचवीण्यासाठी संवर्धन, संरक्षण, उत्खनन होण्यासाठी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले या संदर्भात जिल्हाधिकारी यांना बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या माध्यामातुन भिक्खु संघ बिन भंते सोमानंद , जिल्हा संयोजक सुजित बांगर , प्रकाश धुरंधर, विजय इंगळे, किसन धुरंधर यांनी निवेदन दिले