संग्रामपुर पंचायत समिती कार्यालयातील कस्टडी रूममध्ये मध्यधुंद शिक्षकाचा राडा

संग्रामपूर [ प्रतिनिधी ] येथील पंचायत समिती अंतर्गत वरवट बकाल येथे कार्यशाळेत नियुक्ती झालेल्या ठिकाणी न जाता पंचायत समितीतील कस्टडी रुम मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना पं स कार्यालयात घडली पंचायत समिती कार्यालयात आज दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका ठेवलेल्या कस्टडी रूममध्ये एका मध्य धुंद शिक्षकांने चांगलाच राडा केला. महेंद्र रोठे असे या शिक्षकाचे नाव असून या शिक्षकाची नियुक्ती आज वरवट बकाल येथे एका कार्यशाळेत केलेली होती, मात्र हा शिक्षक कार्यशाळेत न जाता पंचायत समितीतील कस्टडी रूम मध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना चांगली शिवीगाळ केली. वास्तविकता कस्टडी रूममध्ये अतिशय सुरक्षित असे दहावी आणि बारावीचे प्रश्नपत्रिका संच ठेवलेले असतात या रूममध्ये नेमलेल्या व्यक्तीशिवाय कुणालाही जाता येत नाही. राज्यभरात प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार समोर येत असताना कस्टडी रूम मध्ये शिक्षकाने मध्यधुंद अवस्थेत चांगलाच राडा केल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली त