क्राईम
संग्रामपूरात ६५ वर्षीय आजोबाने केली कुऱ्हाडीने नातू व गर्भवती सुनेची हत्या, आरोपी अटक
संग्रामपूर [ प्रतिनिधी ] येथे ६५ वर्षीय वृद्धाने (आजोबाने ) ८ वर्षीय नातु व सुनेची कुऱ्हाडीने सपासप वार करुन दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना दि २३ जानेवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली मिळालेल्या माहिती नुसार तामगावं पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संग्रामपूर शहरात नारायण गायकी वय ६५ वर्ष यांनी आपल्याचं घरातील सुनेला व नातुला कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. नातू समर्थ देवानंद गायकी वय अंदाजे ८ वर्ष हा जागीच ठार झाला असून सून अंदाजे वय ३५ वर्ष अश्विनी गणेश गायकी हि महिला गंभीर जखमी अवस्थेत सदर महिलेला रुग्णवाहीके मध्ये टाकून वरवट बकाल येथे नेण्यात आले होते. महिलेच्या डोक्यात जास्त मार लागल्याने महिलेला रुग्णवाहीके मध्येच ठेऊन तपासण्यास डॉक्टरांना नातेवाईकांनी बोलविले परंतु कोणीच डॉक्टर तेथे तपासण्यास आले नाहीत म्हणून त्या महिलेला पुढे शेगाव येथे नेण्यात आले. शेवटी तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्या महिलेचा देखील मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सुत्रानी दिली. सदर महिला ८ ते ९ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली असून घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी यांना समजताच या दरम्यान उपविभागीय अधिकारी डी गवळी यांनी घटना स्थळी भेट देऊन तामगाव पोस्टेचे ठाणेदार पवार यांच्या कडून घटनेचा आढावा घेतला जिल्हा पोलीस अधिक्षक कडासने , अप्पर पोलीस अधिक्षक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी डी गवळी यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास ठाणेदार राजेन्द्र पवार करित आहे. वृत्त लिहे पर्यत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती